शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दीकींच्या मोबाइल डिटेल्सची चोरी; पोलिसांनी दिल्लीतून केली एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 05:49 IST

आरोपीने तो मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचे मोबाइल डिटेल्स चोरून दुसऱ्या सीमकार्डवर तो नंबर सुरू करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीतून एका संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याचे नाव विवेक सब्रवाल असून, तो सायबर फसवणूक करण्याच्या प्रयत्नात होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी कुटुंबीयांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला होता. त्याचा वापर त्यांचे कुटुंबीय करीत असलेल्या दोन व्यवसायाशी संलग्न आहे. दरम्यान, २४ जून रोजी दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते. आरोपीने तो मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता; पण कंपनीने संबंधित व्यक्तीचा अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे सिद्दीकीची मुलगी डॉ. अर्शिया यांना कळवल्याने हा प्रकार लक्षात आला. याबाबत डॉ. अर्शिया यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीवर यापूर्वीही गुन्हे 
आरोपी सब्रवाल हा दिल्लीच्या बुराडी परिसरातील रहिवासी असून, त्याच्या विरोधात काही सायबर गुन्हेही दाखल आहेत. ज्यापैकी एका प्रकरणातून तो जामिनावर सुटला होता. आम्ही दिल्लीतील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्याला रविवारी सकाळी दिल्लीतून ताब्यात घेत सोमवारी मुंबईला आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकी