Aunt, you are so good! Thieves give thanks after the robbery of 50 lakhs | काकू, तुम्ही खूप चांगल्या आहात! 50 लाखांच्या घरफोडीनंतर चोरांनी मानले आभार
काकू, तुम्ही खूप चांगल्या आहात! 50 लाखांच्या घरफोडीनंतर चोरांनी मानले आभार

पटना : चोरी केल्यानंतर मुद्देमाल परत पाठवून दिल्याचे अनेक किस्से ऐकण्यास येत असतात. अशीच एक घटना बिहारच्या राजधानी पटनामध्ये घडली आहे. पत्रकार नगरातील एका घरामध्ये मोठी घरफोडी करण्यात आली. तब्बल 50 लाखांचे सोने, रक्कम आदी चोरट्यांनी लंपास केली. मात्र, जाताना त्यांनी लिप्स्टिकने असे काही लिहिले की त्या घरातील लोक पाहतच राहिले.


घरातील सदस्य छटपुजेसाठी सदनिका बंद ठेवून गावी गेले होते. ही संधी साधून चोरांनी घर साफ केले. यावेळी घरमालकाच्या वरच्या मजल्यावर भाडेकरू राहत होते. त्यांना आवाज आल्याने जाग आली. यामुळे चोरांनी मुद्देमाल घेऊन पळ काढला.

 

ही चोरी सोमवारी पहाटे घडली. एका रात्रीत चोरांनी अनेक घरे फोडली. या घरामध्ये तब्बल 50 लाखांचे सोन्याचे दागिने, पैसे आदी चोरण्यात आले आहेत. मात्र, या चोरांनी जाताना 'भाभीजी आप बहोत अच्छी है' असे आरशावर लिहित घर मालकाबद्दल अपशब्दांमध्ये लिहिले आहे. यामुळे घरातील सदस्यांसह पोलिसही चक्रावले आहेत. कारण असे लिहिणारा एकतर परिचित असावा किंवा आसपास राहणारा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Aunt, you are so good! Thieves give thanks after the robbery of 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.