ठळक मुद्दे दक्षिण कोलकाता येथील टॉलीगुंगे भागात राहणारा पलाश घोष याला मुंबई एटीएसने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकावणाऱ्या तरूणाला मुंबईपोलिसांनीअटक केली आहे. पलाश बोस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबईपोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी रात्री कोलकाता येथून अटक केली. आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
दक्षिण कोलकाता येथील टॉलीगुंगे भागात राहणारा पलाश बोस याला मुंबई एटीएसने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ कॉलवरून त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकावल्याचा आरोप आहे. पलाश याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्याचा ट्रांझिट रिमांड घेऊन मुंबईत आणले जाईल.
अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. काल मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर तोडक कारवाई केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दांमध्ये घणाघाती टीका सुरू केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
Read in English
Web Title: ATS arrested man from Kolkata for threatening Sanjay Raut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.