‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 06:47 PM2020-09-08T18:47:08+5:302020-09-08T18:47:53+5:30

कंगना राणौतने रियाची केली पाठराखण 

"Rhea is the scapegoat, she should reveal the name of the mastermind in the Sushant case" | ‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

Next
ठळक मुद्देसुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया पिंकव्हिलाला दिली.

सुशांत सिंग राजपूत हत्ये प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन संबंधी एनसीबीने आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाअटक केली आहे. त्यानंतर अभिनेत्री कंगनाने तिची पाठराखण करत “मी नेहमी म्हणत आलेय की रिया फक्त बळीचा बकरा आहे, ती कदाचित ड्रगी असू शकते परंतु आता तिने सुशांतच्या प्रकरणात अनेक पडद्यामागील मास्टरमाइन्डची नावे उघड केली पाहिजेत, ज्या सुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया पिंकव्हिलाला दिली.

तसेच पुढे कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली की, इंडस्ट्रीतल्या विशेषाधिकारांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले, सुशांतच्या न्यायासाठी मागणी करणारी असलेल्या कंगनाने अप्रत्यक्षरित्या रियाची पाठराखण केली आहे. उद्या कंगना मुंबईत येणार असून तिचा आणि संजय राऊत यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अखेर अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रियाला दुपारी 3.45 वाजता अधिकृतपणे अटक करण्यात आली.

त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर तिची सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तिला पुन्हा एनसीबी कार्यालयात आणले जाईल. यानंतर रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाईल. रियाच्या अटकेवर तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याने ग्रासलेल्या आणि ड्रग्ज सेवनाने आत्महत्या केलेल्या एका व्यसनाधीनतेच्या प्रेमात पडल्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली. ही न्यायाची विडंबना आहे. ती गेली अनेक वर्ष ५ प्रसिद्ध डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करून घेत त्याची काळजी घेत होती. एका महिलेच्या मागे तीन - तीन केंद्रीय संस्था तपासासाठी आहेत.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

 

Web Title: "Rhea is the scapegoat, she should reveal the name of the mastermind in the Sushant case"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.