रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:13 PM2020-09-08T14:13:59+5:302020-09-08T14:16:12+5:30

Sushant Singh Rajput Case : रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

Rhea makes big revelation, preparing to interrogate 25 Bollywood celebrities for NCB inquiry | रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

googlenewsNext
ठळक मुद्दे रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. आज रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने कडक कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात शोविक आधीपासूनच एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याचवेळी एनसीबीची रियाची चौकशी सुरूच आहे. आज तिसर्‍या दिवशी एनसीबीने पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलावले आहे. अटकेची तलवार रियाच्या डोक्यावर टांगलेली आहे. दुसरीकडे आता रिया देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरूद्ध तक्रार दाखल केली. रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली. यापूर्वी रिया ठाम होती की तिने कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. सूत्रानुसार एनसीबीने डोजियर तयार केले आहे. यात २५ बॉलिवूड कलाकारांची नावे आहेत. हे डोजियर एनसीबी एसआयटीने तयार केले आहे. या यादीमध्ये सेलेबल्सची नावे ए, बी आणि सी प्रकारात समाविष्ट करण्यात आली असून लवकरच एनसीबी बॉलिवूडमधील या कलाकारांना बोलवणार आहे. रिया-शोविक, ड्रग्ज पॅडलर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केल्यानंतर ही यादी तयार केली गेली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे. 

 

ही यादी एनसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांना दाखवली गेली आहे. काल रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले गेले. परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली होती. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते. परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली. ड्रग्स विक्रेता बासिद परिहारला पाच वेळा भेटले. सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याची भेट झाली. सुशांत नैराश्येत होता. शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता असं रियाने सांगितले. त्याचसोबत रियाने या चौकशीत एका मोठ्या व्यक्तीचं नाव घेतले. मात्र, एनसीबीने या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला. मात्र अखेर आज अडखळत का होईना रियाने ती ड्रग्ज घेत असल्याचं काबुल केलं आहे. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

 

Web Title: Rhea makes big revelation, preparing to interrogate 25 Bollywood celebrities for NCB inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.