शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:35 IST

स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक करणा-यास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली.

ठाणे : स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक करणा-या रामप्रवेश लल्लनप्रसाद महातो ऊर्फ गोविंद खिडकी (५३, रा. सागाव, डोंबिवली, ठाणे) याला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मुंबईचे रहिवासी विक्रांत बारटक्के यांना स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली गोविंद खिडकी याच्यासह आठ जणांनी १० लाखांची फसवणूक केली होती. गोविंद तसेच महिंद्र पारिंगे ऊर्फ महेंद्र पाटील (२५), राशीदअली शेख (३३), मंगेश शिनगारे (५०), राजू शिनगारे (५०), जावेद खान (३५), प्रवीण कांबळी (५३), मोहम्मद वसीम खान (२७) तसेच छोटू अशा नऊ जणांनी ९ मार्च २०१५ रोजी साकीनाका जंक्शन येथे बारटक्के यांच्याकडून १० लाख घेतले. पोलिसांची धाड पडल्याचा बनाव करून पैसे घेऊन त्यांनी पलायन केले. त्यानंतर, बारटक्के यांना त्यांचे सोने किंवा पैसेही त्यांनी परत केले नाही. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महिंद्र पारिंगे याच्यासह सात जणांना अटक केली होती.याप्रकरणातील छोटू आणि गोविंद हे दोघे हुलकावणी देत होते. यातील गोविंद हा ठाण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी त्याला पकडण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे