२८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:05 IST2026-05-05T09:03:31+5:302026-05-05T09:05:32+5:30

विशेष म्हणजे या कारवाईच्या आदल्या दिवशीच तोटेवार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती आणि त्यांची मुंबई येथे बदलीही करण्यात आली होती

API Vaishali Totewar suspended in Rs 28 lakh bribe case; Order of dismissal also cancelled | २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द

२८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द

किरण शिंदे

पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३० लाखांच्या लाचेच्या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जमिनीच्या वादासंदर्भातील एक तक्रार अर्ज चौकशीसाठी तोटेवार यांच्याकडे आला होता. या प्रकरणात त्यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून सुरुवातीला २ लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित २८ लाख रुपये घेताना ACB ने सापळा रचून त्यांना पकडलं. ही कारवाई पुण्यातील बंडगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, विशेष म्हणजे या कारवाईच्या आदल्या दिवशीच तोटेवार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती आणि त्यांची मुंबई येथे बदलीही करण्यात आली होती. पुणे पोलिस दलातून त्यांना कार्यमुक्तदेखील करण्यात आलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्या लाचखोरी प्रकरणात अडकल्या. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावरील निलंबनासोबतच कार्यमुक्तीचा आदेशही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून ACB कडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : 28 लाख रिश्वत मामले में API वैशाली तोटेवार निलंबित

Web Summary : API वैशाली तोटेवार 28 लाख रिश्वत लेते पकड़ी गईं, जिसके बाद निलंबित कर दी गईं। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने होटल में जाल बिछाकर पकड़ा। तोटेवार का तबादला आदेश रद्द। मामले से पुलिस भ्रष्टाचार उजागर।

Web Title : API Vaishali Totewar Suspended in 2.8 Million Bribe Case

Web Summary : API Vaishali Totewar suspended after caught accepting 2.8 million bribe. Anti-Corruption Bureau trapped her in a hotel. Totewar's transfer order cancelled. The case highlights police corruption issues.