पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:01 IST2025-07-03T12:59:23+5:302025-07-03T13:01:46+5:30
Newly Wed Wife killed Husband: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखीच एक घटना समोर आली आहे. आत्याच्या नवऱ्यासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी नवविवाहित तरुणीने पतीची सुपारी देऊन हत्या केली.

पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
Wife killed Husband News: देशाला हादरवून टाकणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखीच घटना घडली आहे. लग्न होऊन महिना दीड महिना होत नाही, तोच नवविवाहित तरुणीने सुपारी देऊन तिच्या पतीची हत्या केली. बिहारमधीलऔरंगाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतीची हत्या करणाऱ्या तरुणीचे तिच्या आत्याच्या नवऱ्यासोबत मागील १५ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. हे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तिने आत्याच्या नवऱ्यासोबत मिळून थंड डोक्याने कट रचला आणि पतीलाच संपवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पतीची हत्या करणाऱ्या नवविवाहित तरुणीचे नाव गुंजा सिंह असे आहे. गुंजाचे जीवन सिंह (वय ५२, आत्याचा नवरा) याच्यासोबत मागील १५ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
लग्नानंतर पतीची हत्या, काय घडलं?
आत्याच्या नवऱ्यासोबत मागील १५ वर्षांपासून अफेअर सुरू असताना गुंजा सिह हिचा नबीनगर तालुक्यातील बारवान येथील २४ वर्षीय प्रियांशू कुमार सिंह यांच्यासोबत लग्न झाले होते. मे महिन्यात दोघांचे लग्न झाले. कुटुंबाच्या दबाबामुळे तिने प्रियांशूसोबत लग्न केले.
वाचा >>वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
लग्नानंतरही आत्याच्या नवऱ्यासोबतचे प्रेमसंबंध सुरूच होते. ते गुप्त ठेवण्यासाठी तिची धडपड सुरू होती. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या प्रियांशूची हत्या करण्याचे तिने ठरवले.
हत्येसाठी अवलंबला सोनम रघुवंशी पॅटर्न
औरंगाबादचे पोलीस अधीक्षक अबरिश राहुल यांनी सांगितले की, गुंजा सिंह हिने प्रियांशू कुमार सिंहची हत्या करण्यासाठी सोनम रघुवंशीसारखाच कट रचला. हा कट तिने आणि ज्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू आहेत, त्या जीवन सोबत मिळून रचला होता.
जीवन सिंहने प्रियांशूच्या हत्येसाठी झारखंडमधून दोघांना बोलावले. त्यांना सीमकार्ड आणि येण्याची, राहण्याची व्यवस्था केली.
२४ जून रोजी काढला काटा
प्रियांशू वाराणसीला त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता. त्याने नेहमीप्रमाणे गुंजाला कॉल केला आणि तो कुठे आहे, याबद्दल सांगितलं. नवी नगर स्टेशनला उतरल्यानंतर त्याने गुंजाला कॉल केला आणि मी घरी येत असून, कुणाला तरी मोटारसायकल घेऊन घ्यायला पाठव असे सांगितले. त्यानंतर गुंजाने ही सगळी माहिती हत्येची सुपारी दिलेल्या दोन लोकांना पाठवली. त्यानंतर दोघांनी प्रियांशू असलेले ठिकाण गाठले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर गोळ्या घालून त्याची हत्या केली.
गुंजासह तिघांना अटक
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुपारी देऊन हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर यात प्रियांशूची पत्नीही सहभागी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिला अटक केली आणि पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर गुंजाने तिच्या आत्याच्या नवऱ्यासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे आणि सुपारी दिल्याची कबुली दिली.
पोलिसांनी गुंजाचा मोबाईल जप्त केला आहे. तिच्या कॉलची तपासणी केली जाणार आहे. प्रियांशूची हत्या करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. जीवन सिंह हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. राजा रघुवंशीप्रमाणे गुंजा सिंहने प्रियांशूची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
गुंजाला आत्याच्या नवऱ्यासोबत करायचं होतं लग्न
गुंजा आणि जीवन यांच्या प्रेमसंबंधांबद्दल त्यांच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना कळले होते. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले. पण, कुटुंबीयांनी याला विरोध केला. हे कळल्यानंतर गुंजाच्या घरच्यांनी गुंजाचे बळजबरीने प्रियांशूसोबत लग्न लावून दिले होते.