शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुधासाठी पित्याने पैसे न दिल्याच्या रागात आईने बाळाला साेडले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:34 IST

Mother threw Baby on Road : दोन तास उलटूनही बाळाची आई न आल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून बाळाला पोलिसांच्या ताब्यात देत, तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देदोन टाकी परिसरात राहणाऱ्या रूपा माथुन दंतानी (वय ४०) यांचा चिंधीचा व्यापार आहे. शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दोन टाकी परिसरात चिंंधी विकण्यासाठी गेल्या.

मनीषा म्हात्रे

मुंबई : कोरोनामुळे आधीच उपासमारीची वेळ ओढवली असतानाच प्रियकर असलेल्या बाळाच्या पित्यानेही मुलाच्या दुधासाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईने भुकेने व्याकुळ झालेल्या चार ते पाच महिन्यांच्या बाळाला चिंधी बाजारातील फूटपाथजवळ सोडल्याचा  प्रकार समोर आला आहे. मात्र सुदैवाने हे बाळ एका मातेला सापडले. तिने त्याला दूध पाजून पोलिसांच्या हवाली केले. पुढे जे. जे. मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आईचा शोध घेत तिला बेलापूरमधून अटक केली.

दोन टाकी परिसरात राहणाऱ्या रूपा माथुन दंतानी (वय ४०) यांचा चिंधीचा व्यापार आहे. शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दोन टाकी परिसरात चिंंधी विकण्यासाठी गेल्या. चिंधी विकत असताना सहाच्या सुमारास लहान बाळाचा रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता मागच्या पदपथाजवळ त्यांना चार ते पाच महिन्यांचे बाळ रडताना दिसले. त्यांनी त्या बाळाला ताब्यात घेत, परिसरात सर्वत्र चौकशी केली, बाळाला भूक लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. पालक बाळाला शोधत येतील असे समजून बाळाला सोबत ठेवले. दोन तास उलटूनही बाळाची आई न आल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून बाळाला पोलिसांच्या ताब्यात देत, तक्रार दाखल केली.

त्यानुसार, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोवार, जमादार व पथकाने आईचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि स्थानिक खबऱ्यांमार्फत शोध घेत बेलापूरमधून तिला ताब्यात घेतले.महिलेकडे केलेल्या चौकशीनुसार, तिचे दोन विवाह झाले असून दोन्हीही पती तिला सोडून गेले. सध्या ती प्रियकरासोबत बेलापूरमध्ये राहते. त्यांना बाळ आहे. तिच्या प्रियकराचा दोन टाकी परिसरातील चिंधी बाजारात व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. ७) ती बाळासह तेथे गेली. बाळाच्या दुधासाठी तिने त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र प्रियकराने पैसे न दिल्याने रागाने ती तेथून निघून गेली. पुढे तेथील पदपथावर बाळाला सोडून घर गाठल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार २९ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिला जामिनावर साेडण्यात आले.बाळाची रवानगी बालगृहात

आईच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा देत, बाळाला बालगृहात पाठविण्यात आल्याची माहिती जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिली.

एकीने नाकारले, दुसरीने जीवदान दिले

रागाने आईने बाळाला रस्त्यावर साेडले, मात्र ते एका मातेला सापडले. तिने त्याला दूध पाजून पोलिसांच्या हवाली केले. पुढे जे. जे. मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने त्याच्या निर्दयी आईचा शोध घेत तिला बेलापूरमधून अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईmilkदूध