शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...

By कुणाल गवाणकर | Published: January 25, 2021 6:22 PM

धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ; पोलीसही चक्रावले

चित्तूर: आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कलियुग सत्ययुगात बदलणार असल्यानं आई, वडिलांनी त्यांच्या दोन मुलींची हत्या केली आहे. कलियुगाचं रुपांतर सत्ययुगात होणार असल्यानं दैवी शक्तींनी मुली पुन्हा जिवंत होतील, अशा समजुतीत असलेल्या पालकांनी त्यांच्या पोटच्या मुलींना संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.मृत मुलींचे आई, वडील अतिशय सुशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारचं पाऊल का उचललं याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे. 'रविवारी रात्री आई, वडिलांनी स्वत:च्या मुलींची हत्या केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या एक सहकाऱ्याला दिली. त्यानंतर सहकाऱ्यानं हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत मुलींचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.मदनपल्लीच्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईनंच त्यांची हत्या केली. एका मुलीला संपवण्याआधी तिचं मुंडन करण्यात आलं होतं. त्यावेळी वडील सर्व पाहत होते. आईनं त्रिशूळाच्या मदतीनं आधी लहान मुलीला संपवलं. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर दाम्पत्य स्वत:ला संपवणार होतं. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला.मृत मुलींच्या वडिलांचं नाव व्ही. पुरुषोत्तम नायडू (एम. एसस्सी, पीएचडी) आहे. ते मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात एसोसिएट प्रोफेसर आहेत. तर मृत मुलींची आई पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. त्या एका स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश