'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:42 IST2020-02-19T19:38:46+5:302020-02-19T19:42:41+5:30

गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

An alleged encounter with a notorious gangster who robbed the husband of 'this' actress in meerut | 'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर

'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर

ठळक मुद्देशक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. नायडूने पॅरोलवर सुटल्यानंतर स्पेशल सेल, दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगीची हत्या कट रचत होता.

मेरठ - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याकडून ८ कोटींची लूट करणाऱ्या कुख्यात गुंडाचा मेरठ पोलिसांनी चकमकीत गोळ्या घालून खात्मा केला आहे. गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

दिल्लीचा कुख्यात गुंड असलेल्या शक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. या दरम्यान सीओ दौराला यांच्या पोटाला गोळी लागली. एक गोळी एसएसपीच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये जाऊन अडकली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री विशाल चौधरी येथील लावड़च्या चिंदौड़ी गावात सरधना येथे काही गिनदांनी फॉर्च्युनर गाडी चोरली होती. मंगळवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास खबऱ्याने सीओ दौराला जितेंद्र सरगम यांना माहिती दिली की, फॉर्च्युनर गाडी वैष्णो धाम कॉलनीतील घराच्या बाहेर उभी आहे.


अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील  मदनगीर येथे राहणारा नायडू हाच याप्रकरणी दरोडेखोर असल्याची ओळख पटली होती. यावर मेरठ झोन आणि दिल्लीकडून प्रत्येकी १ - १ लाख असे बक्षीस होते. ३१ जानेवारी रोजी नायडूने त्याच्या टोळीचा साथीदार आणि दिल्लीचा रहिवासी असलेल्या हनीला गोळ्या घालून हत्या केली. हनीचे काका टिळकराज यांना पाच गोळ्या लागल्या.
त्याचवेळी दिल्लीच्या कोर्टात शिपायाची हत्या करण्याव्यतिरिक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी आठ कोटींची लूट केली होती. दिल्ली पोलिसांनी नायडू यांच्यावर मोक्का लावला होता. नायडूने पॅरोलवर सुटल्यानंतर स्पेशल सेल, दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगीची हत्या कट रचत होता.
 

Web Title: An alleged encounter with a notorious gangster who robbed the husband of 'this' actress in meerut