An alcoholic husband's life ends up with two wives | दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दोन पत्नींनी संपविले
दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दोन पत्नींनी संपविले

ठळक मुद्देराजू वाघमारे असं मृत पतीचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.रात्री १२.३० ते १ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली आहे. त्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले आहे.

मुंबई - बांगुरनगर परिसरात दारू पिऊन छळ आणि शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी नवर्याच्या छळाला कंटाळलेल्या दोन पत्नींनी एकत्र येऊन पतीची हत्या केली. ही घटना घडल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. राजू वाघमारे असं मृत पतीचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उशी तोंडावर पकडून श्वासोच्छवास रोखून त्या दोघींनी पतीची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. रात्री १२.३० ते १ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली आहे. त्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दारूच्या नशेत घरी आलेल्या राजू वाघमारेने दोन्ही पत्नींना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. सततच्या छळाला कंटाळून दोन्ही पत्नींनी एकत्र येऊन उशीच्या साहाय्याने वाघमारेचे तोंड दाबले. यावेळी गुदमरून त्याचा मृत्यू झाला. राजुच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचा भाऊ विनोद याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यन मृत राजुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: An alcoholic husband's life ends up with two wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.