शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 19:12 IST

Accused of murder sentenced to life imprisonment : आरोपी गोपाल शेषराव पाटील  दोषी आढळून आल्याने जन्मठेपची शिक्षा सुनावली.


वाशिम : वाडा फॉर्म, मंगरूळपीर येथील खून प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

२ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी गोपाल शेषराव पाटील रा. मंगळसा (ता.मंगरूळपीर) याने अजय महादेव खडसे (१८) रा. वाडा फॉर्म यास ३० नोव्हेंबर २०१२ ते २ डिसेंबर २०१२ या दरम्यान धारदार शस्त्राने मारून जिवाने ठार केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत विहिरीत फेकून दिले, अशी फिर्याद विजय महादेव खडसे (२२) याने मंगरूळपीर पोलीस स्टेशनला दिली होती. या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालिन तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक एस.एल. दोनकलवर यांनी करून सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालय मंगरूळपीर येथे न्यायाधिश रचना आर. तेहरा यांच्या समक्ष २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा खटला चालला. न्यायाधिश तेहरायांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून घेवून आरोपी गोपाल शेषराव पाटील  दोषी आढळून आल्याने त्यांना कलम ३०२ मध्ये जन्मठेप व नगदी एक हजार रूपये दंड व तसेच भादंवी कलम २०१ मध्ये ३ वर्ष कारावास व नगदी ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड.पी.एस.ढोबळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपwashimवाशिम