शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा विनयभंग करून चालत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 15:15 IST

Crime News : डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

कल्याण - आठगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान चालत्या रेल्वे गाडीत एका तरुणीचा दोन जणांनी विनयभंग केला. तरुणीने प्रतिकार केला असता तिला चालत्या रेल्वे गाडीतून फेकून देण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. तरुणीने प्रतिकार करून प्रसंगावधान दाखविल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकारामुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.कसारा येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलवर बड्या पदावर कार्यरत आहे. कामानिमित्त ती दररोड कसारा ते ठाणे दरम्यान प्रवास करते. लॉकडाऊननंतर महिला प्रवाशांकरीता विशेष रेल्वे गाडय़ा सुरु केलेल्या आहेत. ही तरुणी रेल्वेने प्रवास करते. नेहमी प्रमाणे २५ नोव्हेंबर रोजी ती ठाण्याला कामाला गेली होती. कामावरुन सुटल्यावर तिने रात्री ठाण्याहून कसारा येथे येण्याकरीता गाडी पकडली. ठाणे रेल्वे स्थानकातून गाडी सुटली तेव्हा महिला डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. त्यानंतर विविध स्थानकात महिला प्रवासी उतरल्या. आटगाव रेल्वे स्थानक येईपर्यंत महिलांचा डबा रिकामा झाला. महिला डब्यात केवळ ही तरुणीच प्रवास करीत होती.आठगाव रेल्वे स्थानकातून गाडीने स्थानक सोडले. तेव्हा धावत्या रेल्वे गाडीत दोन जण चढले. हे दोघेही दारुच्या नशे तर्र होते. त्यांना पाहून एकटीच असलेली तरुणी प्रथम भयभीत झाली. तिने तिच्या मोबाईलवर त्या दोघांचा फोटा काढून तो तिच्या नातेवाईकांना पाठविला. त्यांना कसारा रेल्वे स्थानकात येऊन थांबण्याचा मेसेज दिला. डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी त्या तरुणींचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा सुरु असताना गाडीने कसारा रेल्वे स्थानक गाठले. एका तरुणाने पळ काढला तर एक जणाला कसारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरुणीच्या नातेवाईकांनी पकडले. दुस-या आरोपीला आज कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीची नावे अमोल जाधव व अमन हिले अशी आहेत.कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी सांगितले की, तरुणीचा विनयभंग व तिला चालत्या गाडीतून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.महिला डब्यात अन्य कोणी महिला प्रवासी नसल्यास पुरुषांच्या डब्यातून प्रवास केला पाहिजे. सर्व ठिकाणी गस्त वाढविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणthaneठाणे