शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार अडचणीत; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:44 IST

आमदारासह भाजपा शहर अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

ठळक मुद्दे बांधकाम कामगार कीट वितरणप्रसंगी महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुमसर येथे बांधकाम कामगार कीट वाटप कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे.गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा- पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गंभीर गुन्हा भाजपाचेआमदार चरण वाघमारे यांच्यावर दाखल झाला आहे. बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार वाघमारेंसह भाजपा शहर अध्यक्षावरही विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचं आश्वासन भाजपानं निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र त्याच पक्षाच्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कामगारांना किट वाटप केलं जात असताना आमदार वाघमारेंनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. १६ सप्टेंबरला हा प्रकार घडला. रात्री किट वाटप होणार असल्याची माहिती कामगारांना मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष बांधकाम कामगार एकत्र जमले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुमसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तैनात होत्या. किट वाटप सुरू असताना गोंधळ होऊ नये म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग लावण्यात आली होती. त्यावेळी महिलांच्या रांगेत असलेल्या एका गरोदर महिलेला त्रास झाला. त्या महिलेशी पोलीस उपनिरीक्षक बोलत असताना भाजपाचे शहर अध्यक्ष अनील जिभकाटे तिथे आले. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा एकेरी उल्लेख करुन वाद घातला. याशिवाय अर्वाच्य भाषेत शिवीगाळदेखील केली. त्यावेळी आमदार चरण वाघमारेही तेथे उपस्थित होते. मात्र आमदारांनी हा प्रकार थांबवण्याऐवजी आपली खिल्ली उडवून अपमान केला, अशी तक्रार संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकांनी तुमसर पोलीस ठाण्यात दिली.या प्रकरणी आज संध्याकाळी आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. ३५३, ३५४, २९४, ५०४, ५०६, ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सिडाम करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदाराविरोधात विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कामगार किट वाटप प्रसंगी मी उपस्थित होतो. माझी बाचाबाचीही झाली. परंतु आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. या ठिकाणी शेकडो कामगार उपस्थित होते. त्यांचा जबाब घ्यावा, चौकशी करावी. मी दोषी असेन, तर निश्चितच शिक्षा द्यावी. एखाद्या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीची तक्रार करणे अशोभनीय आहे. ही तक्रार राजकीय द्वेशातून आणि सूडबुद्धीने करण्यात आली आहे. -आमदार चरण वाघमारे, तुमसर   

टॅग्स :MolestationविनयभंगMLAआमदारPoliceपोलिसBJPभाजपाWomenमहिला