फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली

By प्रदीप भाकरे | Updated: September 5, 2024 19:08 IST2024-09-05T19:08:25+5:302024-09-05T19:08:37+5:30

महिला सेलच्या दामिनी पथकाची कारवाई : केबिन संस्कृतीवर टाच

Abuse at Family Restaurant; Caught a couple again | फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली

फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली

अमरावती : तरूण प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये घेऊन जागा उपलब्ध करून देणाऱ्या राजापेठ परिसरातील वाआ फॅमिली रेस्टॉरंटवर महिला सेलच्या दामिनी पथकाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी धाड टाकली. यावेळी तेथे दोन जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली.

राजापेठ परिसरातील वाआ रेस्टॉरंटमध्ये काही तरुण तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची माहिती महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राह्मणे यांना मिळाली. त्याआधारे पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राह्मणे यांनी पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले व दामिनी पथकासह वाआ रेस्टॉरंटवर धाड टाकली. तेथे चार तरुण व तरुणी अश्लिल चाळे करताना आढळून आलेत. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस प्रतिबंधक अधिनियमाअन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी व पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजीदेखील गाडगेनगर भागातील दोन कॅफेतून सहा जोडपी पकडण्यात आली होती.

Web Title: Abuse at Family Restaurant; Caught a couple again