शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाती आई, १६ वर्षीय मुलगी, मिलचा चक्कीवाला, १ हजार रुपये; दीड वर्ष अत्याचार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 06:50 IST

डी.एन.नगर पोलिसांनी मुलीच्या ४० वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

- मनीषा म्हात्रे

मुंबई : जन्मदात्या आईनेच पोटच्या १६ वर्षीय मुलीचा तिच्या वयापेक्षा तिप्पट वयाच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सौदा केल्याची मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अंधेरीमध्ये समोर आली आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराला मुलीनेच वाचा फोडली असून डी.एन.नगर पोलिसांनी मुलीच्या ४० वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. 

अंधेरी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलगी आईसोबत राहायची. वडिलांच्या अकाली निधनानंतर या दोघींना एकमेकींचाच आधार होता. लहानपणीच सुरुवातीला आईने घरकामात जुंपले. पुढे, आईने जून २०२१ पासून जनता फ्लोअर मिलमध्ये कामासाठी पाठवले. मात्र, तेथे कामाऐवजी फ्लोअर मिलचा चक्कीवाला तिला एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार करू लागला. मुलीने त्याला विरोध केला; पण ती त्याच्यापुढे असह्य होती.   

तो तिला मारहाण करून अत्याचार करत होता आणि प्रत्येकवेळी हजार रुपये देत होता. मुलीने याबाबत आईलाही सांगितले. मात्र, तिने देखील ‘तुझे ते काम आहे ते करायचे’, असे सांगून तिच्यावर दबाव आणला. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मुलीवर अत्याचार सुरू होते. वासनाधीन व्यक्तीच्या विकृतीला कंटाळून अखेर मुलीने पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.  

मुलगी मानसिक धक्क्यात

या घटनेमुळे मुलगी मानसिक धक्क्यात असून पोलिसांकडून तिच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच, अन्य कुठल्या व्यक्तीसोबतही तिला शारीरिक संबंधासाठी दबाव आणला होता का? याबाबतही पोलिस चौकशी करत आहे.

पोलिसांनी तत्काळ ४०  वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या चक्कीवालाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वृत्ताला डी.एन.नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दुजोरा देत अधिक  तपास सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस