मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 22:08 IST2025-08-14T21:52:57+5:302025-08-14T22:08:05+5:30

young woman raped in Delhi Latest News: मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावून घेतलं. तिथे तिचे मित्रही आलेले होते. ते दारु प्यायले. तरुणीला नशा चढताच तिच्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. 

a 24 year old girl gang raped in house party in delhi's civil lines area also made gang rape video | मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ

मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ

Delhi Rape Crime Latest news: एका २४ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सिव्हील लाईन्स भागात ही घटना घडली. अत्याचार करण्यात आलेल्या तरुणीला तिच्या मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावलं. तिथे तिची एक मैत्रीण आणि काही मित्रही होते. तिथेच तिला ड्रग्ज दिले गेले आणि सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांनी अत्याचाराचे व्हिडीओही बनवले आणि कुणाकडे याबद्दल वाच्यता केल्यास हे व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकीही दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

मैत्रिणीच्या मित्राकडे होती पार्टी

२४ वर्षीय पीडित तरुणी एका खासगी कंपनीमध्ये काम करते. ती दिल्लीतीलच पंजाबी बाग भागामध्ये राहते.  तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तिची नीतू नावाची मैत्रीण आहे. नीतूने तिला कॉल केला आणि माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे, तू पण ये असे म्हणाली.

नीतूच्या सिव्हील लाईन्स भागात राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटमध्ये रविवारी ही पार्टी होती. तरुणीने सांगितले की, मी त्या घरी गेले तेव्हा तिथे मी पाच जण होते. त्यात नीतू होती आणखी एक तरुणीही होती. 

नशा चढताच त्यांनी गँगरेप केला

पीडित तरुणीने सांगितले की, त्यांनी माझ्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. त्यामुळे काही वेळातच मला नशा चढली. माझी शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. 

पार्टीत असलेल्या दोन्ही तरुणींना मला मारहाण केली आणि अत्याचाराचे व्हिडीओ बनवले. हे सगळं घडल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली की, तू जर याबद्दल कुणाला सांगितलं तर आम्ही हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू. त्यानंतर त्यांनी पीडित तरुणीला घरी सोडलं आणि फरार झाले. 

या सगळ्या घटनेने तरुणीनी हादरली. तिने लगेच पोलीस ठाण्यात गाठले आणि पोलिसांना झालेली आपबीती सांगितली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेत आहेत. 

५० वर्षाच्या चालकाचा ४० वर्षीय महिलेवर बलात्कार

राजधानी दिल्लीत बलात्काराची आणखी एक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेवर ५० वर्षीय चालकाने बलात्कार केला. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात ही घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने घरात घुसून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे. 

Web Title: a 24 year old girl gang raped in house party in delhi's civil lines area also made gang rape video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.