4 storey Ahmed building collapsed in the Crawford Market area | क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली 
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली 

ठळक मुद्देपोलीस कमिशनर ऑफिस जवळ असलेल्या अहमद ही ४ मजली इमारत कोसळलीघटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू

मुंबई - क्रॉफर्ड मार्केट परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळली आज सकाळची १०.४२ वाजताच्या सुमारास कोसळली आहे. इमारतीचं नाव अहमद असं असून क्रॉफर्ड मार्केटमधील लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळ ही चार मजली इमारत रिकामी होती.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या मार्गावर इमारतींची दाटीवाटी असल्याने मदत कार्यात अडचणी निर्माण होत होत्या. या घटनेत अद्याप कुणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती नाही. आज सकाळी १०:४२ वाजताच्या सुमारास एल. टी. मार्ग, पोलीस कमिशनर ऑफिस जवळ असलेल्या अहमद ही ४ मजली इमारत कोसळली असून घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू असून इमारत रिकामी असल्याने या  घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त माहितीनुसार देण्यात आली आहे. 


Web Title: 4 storey Ahmed building collapsed in the Crawford Market area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.