शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

नक्षलवाद्यांच्या आयईडीच्या स्फोटात ३ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 14:44 IST

3 jawans martyred and 2 seriously injured in IED blast by Naxals : झारखंडचे जगुवार जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान जखमी झाले.

ठळक मुद्देगुरुवारी झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात तीन सुरक्षा दलाचे तीन जवान शहिद झाले तर  दोन जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

झारखंडच्या जंगलात आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात तीन सुरक्षा दलाचे तीन जवान शहिद झाले तर  दोन जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.झारखंड जगुवार जवान, झारखंड पोलिसांची विशेष युनिट, पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील होयाहातू गावात गस्त घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ८.४५  वाजता आयईडीचा स्फोट झाला, त्यात झारखंड जगुवारचे तीन जवान शहीद झाले, झारखंडचे जगुवार जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान जखमी झाले.या स्फोटानंतर झारखंड पोलिस आणि सीआरपीएफतर्फे नक्षलवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीआरपीएफने सांगितले की, 'झारखंडचे राज्य पोलिसांचे झारखंड जगुवारचे ३ जवान शहिद झाले, तर २ जण गंभीर जखमी झाले.  197 बटालियन  सीआरपीएफचा दोन जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमधील चकमक अर्धा तास सुरु होती आणि आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.

 

जखमी जवानकॉन्स्टेबल दीप  टोपनो  (पेग)कॉन्स्टेबल  निक्कू उरांव   (लातेहार)       

शहीद जवानहेड कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार पंडित (गोड्डा)  कॉन्स्टेबल  हार्डवर शाह   (पलामू)कॉन्स्टेबल किरण सुरीन (सिमडेगा) 

झारखंडच्या गुमला येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरूद्ध सुरू असलेल्या पोलिस कारवाईत गुमला पोलिसांना मोठा धक्का बसला होता. आयईडी स्फोटात एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला होता. यात त्याच्या दोन्ही पायाला जबरदस्त नुकसान झाले.मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल उन्मूलन मोहिमेच्या वेळी चैनपूर ब्लॉकमधील कुरुमगड पोलीस स्टेशन परिसरातील  केरागानी च्या जंगलात  नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर भूमिगत आयईडीने स्फोट घडवून आणला आणि त्यात सीआरपीएफचा एक जवान  रोबिन कुमत   गंभीर जखमी झाला. तर इतर काही जवान किरकोळ जखमी झाले होते.

 

टॅग्स :Blastस्फोटJharkhandझारखंडPoliceपोलिसSoldierसैनिकDeathमृत्यू