शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत (भाग २)

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

खूप चांगला अनुभव

खूप चांगला अनुभव
हा अनुभव आम्हाला खूप शिकविणारा आणि ऊर्जा देणारा होता. आपल्या देशासाठी आपण काहीतरी करतोय अशी भावना देणारा होता. यानिमित्ताने दिल्लीत महाराष्ट्राची संस्कृती सादर करण्याची संधी मिळाली. याचा आनंद वाटतो.
राखी शर्मा, सेंट अन्थोनी हायस्कूल, अजनी
---------
पंतप्रधानांसमोर नृृत्य करण्याचा आनंद वेगळा
आपण जे सादर करतोय ते आपल्या देशाचे पंतप्रधान पाहात आहे, याचा आनंद खूप मोठा होता. दिल्लीचे वातावरण त्यामुळे अनुभवता आले. मोदींनाही जवळून पाहता आले. तेथे आमची व्यवस्था छान होती. तेथून परत येण्याची इच्छाच होत नव्हती. पारितोषिकाने तर समाधान वाटले.
इशा सकर्डे, टाटा पारसी हायस्कूल
---------------
आमच्या परिश्रमाचे समाधान वाटते
हे सादरीकरण करण्यासाठी आम्ही सातत्याने तालिम करीत होतो. आम्ही जे परिश्रम घेतले त्याची प्रशंसा झाली त्यामुळे खूप आनंद वाटतो. आमच्या सादरीकरणाने नागपूरचे नाव मोठे झाले, याचा अभिमान वाटतो.
सुरेश शर्मा, बॅ. शेषराव वानखेडे हायस्कूल
----------------
नागरिकांच्या प्रतिसादाने आनंद
आम्ही राजपथावर सादरीकरण करीत असताना नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला. त्यामुळे आपण दिल्लीत नसून नागपुरात असल्यासारखे वाटले. तेथे सर्वांनीच खूप प्रेम दिले. हा अनुभव खूपच छान होता. मोदींना प्रत्यक्ष पाहून तर आम्हाला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे मोदींसह ओबामांनाही प्रत्यक्ष पाहता आले.
मृण्मयी आडेकर, टाटा पारसी स्कूल