शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामान शहरात कायम

By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST

वातावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊस

वातावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊस
नाशिक : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. उष्णता व आर्द्रतेत वाढ झाल्याने बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, आणखी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी ७.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद पेठरोड येथील हवामान केंद्रात झाली.
बुधवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट व वादळी वार्‍याने शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच वृक्षही उन्मळून पडले होते. कमाल तपमान व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने सदर पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. बुधवारी शहराचे कमाल तपमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते, तर एरवी ४० ते ४५ टक्क्यांवर असणारी आर्द्रता सुमारे ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गुरुवारी मात्र कमाल तपमानात घट होऊन ते ३७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर उष्मा कायम असला, तरी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. शहरात सध्या तरी आणखी पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

पाऊस होतोच
उष्णता व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने नाशिक जिल्‘ात पाऊस झाला. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. आता मात्र तशी परिस्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही. मेच्या मध्यावर असा मान्सूनपूर्व पाऊस पडतोच.
- व्ही. के. राजीव, हवामान केंद्र, कुलाबा