शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अतिक्रमणाची धडक मोहीम खासगी बोअर चालकांना तंबी : दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ भागात केली कारवाई

By admin | Updated: May 11, 2014 01:03 IST

सोलापूर :

शहरात अतिक्रमणाची धडक मोहीम बोअर चालकांना तंबी : दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ भागात कारवाई सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ येथील अतिक्रमण काढण्यात आले. दत्तनगर येथील खासगी बोअर चालकांना तंबी देऊन पाणी विकण्यास मनाई करण्यात आली. तसेच या ठिकाणी रस्त्यावर थांबणाºया पाणी वाहतुकीच्या टँकरना ताकीद करण्यात आली. गेल्या आठवड्यात पाच्छापेठ येथे पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत शाळकरी मुलगा ठार झाला होता. याची दखल घेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी सकाळी या परिसराची पहाणी केली. आंध्र दत्त चौकात खासगी पाणी विक्री करणाºया ठिकाणाला भेटी देऊन आयुक्तांनी संबंधितांना ताकीद दिली. तसेच या ठिकाणी थांबणाºया पाण्याच्या टँकरना कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पहाणी केली असता या भागात अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यांनी तत्काळ अतिक्रमण विभागाला आदेश देऊन ते काढण्यास सांगितले. त्यानुसार अतिक्रमण विभागाने ११ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान खासगी बोअरमधून पाण्याची विक्री करणाºया मालकांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढले. त्यानंतर दत्तनगर परिसरात समोर आलेले अतिक्रमणही पाडण्यात आले. गवईपेठ येथे महापालिकेच्या रस्त्यावर खासगी बोअर मालकाने पाणी विक्रीसाठी बांधलेले हौद जमीनदोस्त करण्यात आले. तसेच रविवारपेठ व पाच्छापेठ येथील समोरच्या बाजूला करण्यात आलेले अतिक्रमण पाडण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या या कारवाई प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.डी. जाधव, बाळासाहेब भोसले, एन.एन. बाबर, प्रभाकर काडगी आदी कर्मचारी उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------

अन् कॅन्टीनचे अतिक्रमण काढले... आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सकाळी ६.३0 वा. दत्तनगर येथील अतिक्रमणाची पहाणी केली. दरम्यान त्यांनी याच ठिकाणी असलेले सरगम टी अ‍ॅन्ड कोल्ड्रिंक्स वर जाऊन चहा घेतला होता. मात्र दुपारी त्याच कॅन्टीनचे अतिक्रमण काढण्यात आल्याने सर्वत्र एकच चर्चा होती.

--------------------------------------------

आयुक्तांच्या आदेशावरून या परिसरातील १0 ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरील अतिक्रमण काढले असून ही कारवाई चालूच राहणार आहे. नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घ्यावे. - आर.डी. जाधव, उपअभियंता, महानगरपालिका,