छ. संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या; हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी केली होती लूटमार

By सुमित डोळे | Updated: April 30, 2026 18:56 IST2026-04-30T18:55:39+5:302026-04-30T18:56:58+5:30

१५ हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार पुन्हा गजाआड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Youth Murdered in Chhatrapati Sambhajinagar; Accused Robbed Merchant Half an Hour Before Crime | छ. संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या; हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी केली होती लूटमार

छ. संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या; हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी केली होती लूटमार

छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भाजीमंडईतील देशी दारूच्या दुकानासमोर एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या हत्येच्या अवघ्या ३० मिनिटे आधी आरोपींनी एपीआय कॉर्नर परिसरात एका व्यापाऱ्याला खंडणी मागून लुटले होते.

वादाचे पर्यावसान हत्येत
मयत किशोर हा मजुरीचे काम करायचा. गुरुवारी सकाळी मारेकरी शुभम बडे, दत्ता रोकडे आणि त्यांच्या एका साथीदाराने किशोरला दुचाकीवर बसवून मुकुंदवाडीत नेले. तेथे दारूच्या दुकानाबाहेर त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर भीषण हत्येत झाले. तिघांनी किशोरवर चाकूने सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी किशोर अर्धा तास तिथेच पडून होता, अखेर पोलिसांनी त्याला रुग्णालयात हलवले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

कुख्यात गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
घटनेचे गांभीर्य ओळखून  सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन कदम, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, संतोष गायकवाड यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दत्ता रोकडे आणि शुभम बडे यांना अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. मुख्य आरोपी दत्ता रोकडेवर यापूर्वी प्राणघातक हल्ला, लुटमार आणि चोरीचे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में दिनदहाड़े युवक की निर्मम हत्या

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक युवक, किशोर हिवाले, की शराब की दुकान के पास चाकू मारकर हत्या कर दी गई। हत्या से पहले आरोपियों ने एक व्यापारी को लूटा। पुलिस ने तीन घंटे के भीतर कई अपराधों वाले एक कुख्यात अपराधी सहित दो संदिग्धों को गिरफ्तार किया।

Web Title : Daylight Murder in Chhatrapati Sambhajinagar: Youth Brutally Killed

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a youth, Kishore Hiwale, was stabbed to death near a liquor shop. Before the murder, the accused robbed a businessman. Police arrested two suspects, including a notorious criminal with multiple prior offenses, within three hours of the incident.