शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:31 IST

बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा शिवारातील दोन घटना

सोयगाव : शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर व १५ वर्षीय मुलीवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची तर एक महिला भाजल्याची घटना तालुक्यातील बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अजय नथ्थु राठोड (वय १८ वर्षे, रा. बोरमाळ तांडा) व अश्विनी मच्छिंद्र राठोड (वय १५ वर्षे, रा. हनुमंत खेडा) अशी मृतांची नावे आहेत.

बनोटी परिसरात सोमवारी दुपारी ४ वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी तिडका शिवारात कापूस वेचणीच्या कामासाठी आलेला अजय नथ्थु राठोड हा तरुण आडोशाला झाडाखाली जात असताना त्याच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जवळच असलेल्या त्याच्या ८ शेळ्यांवरही वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. अजय राठोड याच्या पश्चात आजी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

दुसरी घटना तिडका शिवारापासून १३ किलोमीटर अंतरावर हनुमंत खेडा शिवारात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारासच घडली. या शिवारात अनिता मच्छिंद्र राठोड (वय ४० वर्षे) व त्यांची मुलगी अश्विनी मच्छिंद्र राठोड (वय १५ वर्षे) या मायलेकीही शेतात काम करताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आडोशाला झाडाखाली धावल्या. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात अश्विनी राठोड हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई अनिता राठोड या भाजल्या. त्यांना परिसरातील शेतकऱ्यांची उपचारासाठी सोयगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत अश्विनी हिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

बनोटी आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीदरम्यान, दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सपुरा कादरी यांनी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोन्ही घटनांचा पोलिस व महसूल विभागाने पंचनामा केला असून याबाबत सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर