शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून काम करा

By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST

उस्मानाबाद : दिवसेंदिवस प्रशासनात बदल होत आहेत. प्रशासन अधिक गतिमान होत आहे.

उस्मानाबाद : दिवसेंदिवस प्रशासनात बदल होत आहेत. प्रशासन अधिक गतिमान होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे अधिक गतीने होण्यासाठी शासन यंत्रणांनी काम करावे, असे सांगतानाच विविध यंत्रणांनी एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले, येथील जिल्हा परिषद सभागृहात गतिमानता प्रशासकीय अभियानासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, प्रभोदय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. चारही विभागाचेउपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, रवींद्र गुरव, संतोष राऊत, सचिन बारवकर, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ कृषी अधिकारी, विस्ताराधिकारी आदी उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या प्रमुखांनी दरमहा चांगले काम करणार्‍या आणि कामात कुचराई करणार्‍यांची यादी तयार करण्याचे निर्देश देत प्रशासन आता बदलले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनीही बदलले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्या, असेही त्यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग या यंत्रणांनी एकत्रितपणे गावा-गावांत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे व सोडविणे तसेच विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) कामचुकारांना संरक्षण देऊ नका दन्ौंदिन कामकाजात कामचुकारपणा करणार्‍यांची गय करू नका. तसेच चांगले काम करणार्‍यांना प्रोत्साहन द्या, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, प्रत्येक गावांच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्या. ग्रामसेवक, तलाठी भेट नाहीत, अशी तक्रार अनेकदा येते. संबंधित विस्ताराधिकारी, मंडळ अधिकारी यांनी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामे न करणार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देऊ नका. कार्यालयीन बाबी परिपूर्ण ठेवा. नागरिकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुख अथवा विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बेशिस्त कर्मचार्‍यांबाबत कडक कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले.