शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ऊन, भारनियमन, पाणीटंचाईचा तडाखा

By admin | Updated: May 25, 2014 01:32 IST

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले.

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले. शहराचे तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. उन्हाचा तडाखा चालू असतानाच काही भागांमध्ये अघोषित भारनियमनामुळे लहानथोर घामाघूम झाले. या दोन संकटांचा मुकाबला करतानाच विस्कळीत पाणीपुरवठ्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना आज पाण्यासाठी भटकंती करावी लागली व धावपळही करावी लागली. अनेक व्हॉल्व्हची दुरुस्ती न झाल्यामुळे कमी दाबाने अनेक भागात पाणीपुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.: महिन्यापासून शहराचे तापमान वाढतच आहे. शनिवारी तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे गजबजलेल्या रस्त्यांवरील वर्दळ घटली होती. नेहमी वर्दळ असणार्‍या क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट गार्डन, सिडको, हडको भागात गर्दी घटली होती. असह्य उन्हामुळे नागरिकांनी घरात राहणे पसंद केले. उन्हामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. ग्राहकांची उपस्थिती लक्षणीय घटली होती. रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. बहुतेक महिला व पुरुषांनी उन्हापासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. बाजारपेठेत जी वर्दळ दिसत होती त्यांच्यापैकी बहुतेकांकडे छत्री होती. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लहान मुले उन्हामुळेच उद्यान व मैदानावर दिसली नाहीत. गेल्या महिन्याभराचे तापमान पाहता रविवारीही पारा चढलेलाच राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी आज शहरात आलेल्या नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी नाकातोंडाला गमचे बांधलले दिसले. शहागंज परिसरात थंड पेयाच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसली. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.औरंगाबाद शहराचे मे महिन्याचे तापमान हे सरासरी ३९ अंश सेल्सिअस इतके आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांत तापमान सातत्याने अधिकतम राहिले होते. यंदाही मे महिन्यात तापमानाने उंची गाठली. मे महिन्यात पारा ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमान वाढलेले दिसत आहे.