घाटीत नवीन ऑक्सिजन टँक वापराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:59+5:302021-02-05T04:22:59+5:30
रेल्वेस्थानकावर सरकत्या जिन्याचे काम प्रगतिपथावर औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारवर उभारण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्याचे काम ...

घाटीत नवीन ऑक्सिजन टँक वापराविना
रेल्वेस्थानकावर सरकत्या जिन्याचे काम प्रगतिपथावर
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारवर उभारण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. रेल्वेस्थानकावर यापूर्वी दोन सरकते जिने आहेत. आता तिसऱ्या जिन्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेकडून केली जात आहे.
जय विश्वभारती काॅलनीत कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : जय विश्वभारती काॅलनीत सध्या जागोजागी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. परिसरातील कचरा उचलण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील शाळेला लागूनच रस्त्याच्या कडेला कचरा पडून आहे. महापालिकेने नियमितपणे कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
घाटी रुग्णालयात धुराचे लोट
औरंगाबाद : घाटीतील शवविच्छेदन गृहासमोर कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत आहेत. याचा रुग्ण, नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.
जयनगरमधील रस्त्यांची चाळणी
औरंगाबाद : जयनगरमधील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, मोठ्या प्रमाणात खडीही पसरली आहे. त्यामुळे वाहने घसरण्याचा प्रकारही होतो. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.