शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने पुन्हा झोडपले

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. त्यात परिसरातील ठिकठिकाणी वृक्ष व महावितरणचे विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तर या भागातील केळी व द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. औसा तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्री पुन्हा वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने हजेरी लावली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने किल्लारी भागातील वृक्ष व खांब उन्मळून पडले. विद्युत ताराही तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील घरांवरील तसेच शेतातील शेडचे पत्रेही उडाले. या पावसामुळे शेतकर्‍यांसह महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील सहाय्यक अभियंता खान व कनिष्ठ अभियंता पोतदार यांनी किल्लारी गावात चार खांब उन्मळून पडल्याची माहिती सांगितली. परिसरातही खांब कोसळले आहेत. त्याची माहिती एकत्र करणे सुरू असल्याचेही ते म्हणाले. खांब कोसळल्यामुळे बर्‍याच भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. दरम्यान, किल्लारी येथील महादेव शिवहार पाटील यांच्या अडीच एकर केळीच्या बागेला वादळी वारा व पावसाचा फटका बसला. त्यात ५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुंडाप्पा चंद्रकांत बालकुंदे या शेतकर्‍याच्या केळी बागेतील अडीचशे रोप मोडून पडल्याचे त्यांनी सांगितले. बळीराम बालकुंदे यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेलाही फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)औसा : औसा तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री तर काही भागांत शुक्रवारी सकाळीही पाऊस झाला आहे. ३० मे रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने या भागात मोठ्या संख्येने विवाह सोहळे सुरू होते. परंतु, अचानक लावलेल्या पावसाच्या हजेरीने समारंभात वºहाडींची तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळी औसा शहरासह किल्लारी, दापेगाव, जवळगा (पो.) व इतरही भागांत पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भादा परिसरातही शुक्रवारी सकाळी पाऊस झाला.