शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरूमिळणार का?

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखती होत आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखती होत आहेत. या मुलाखतीसाठी देशभरातून २९ तज्ज्ञांना बोलावण्यात आलेले असून, त्यात येथील विद्यापीठातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान, कुलगुरू निवडीकडे मराठवाड्यातील शिक्षणक्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे. भूमिपुत्र कुलगुरू व्हावा, अशी अपेक्षा प्राध्यापक आणि कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी तज्ज्ञ आणि जाणकार, निर्भीड कुलगुरूची निवड करण्याची मागणी केली आहे. कुलगुरूपदी भूमिपुत्र अथवा अन्य मराठवाड्याबाहेरील व्यक्तीची निवड होते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी न्यायमूर्ती सी. के. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार, विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून परवीरसिंग आहुजा आहेत. २९ आणि ३० मे रोजी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात होणार आहे. त्यासाठी त्यांना गुरुवारी सकाळी ९ वाजता बोलाविण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर निवड समिती पाच व्यक्तींच्या नावाचा बंद लिफाफा राज्यपालांकडे सादर करतात. इच्छुक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. वाय. के. खिल्लारे, डॉ. एम. बी. मुळे हे प्राध्यापक कुलगुरूपदासाठी इच्छुक आहेत.