जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:01+5:302021-02-05T04:14:01+5:30

जयभवानीनगर ते सिडको रस्त्याचे काम सुरू औरंगाबाद: जालना रोड ते जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम ...

Will help to regain the old glory | जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी मदत करणार

जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी मदत करणार

जयभवानीनगर ते सिडको रस्त्याचे काम सुरू

औरंगाबाद: जालना रोड ते जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एका बाजूने रस्त्याचे काम होत आले आहे. अंतर्गत इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम देखील करण्यात आले आहे.

एन-३ मधील रस्त्याचे काम सुरू होईना

औरंगाबाद : एन-४ कडून एन-३ कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दोन वेळा सदरील रस्त्याच्या भूमिपूजनाचा नारळ फुटला आहे. हनुमान चौक ते गुरूसहानीनगर मार्गे हायकोर्टाकडे जाणाऱ्या नागरिकांच्या त्या रस्त्यावर वर्दळ असते.

रस्त्यावरील गतिरोधक उखडले

औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक उखडले आहेत. ते गतिरोधक दुरूस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. गतिरोधक नसल्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

हायमास्ट वर्षापासून बंद

औरंगाबाद : विश्रांतीनगर चौकात बसविण्यात आलेला हायमास्ट दीड वर्षांपासून बंद पडलेला आहे. वाटमारी करणे, अंधारात लूटमार करण्याच्या घटना त्या परिसरात वाढत असून त्या हायमास्टवर फोकस बसविण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Will help to regain the old glory