कुजबुज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:11+5:302021-07-29T04:04:11+5:30

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ...

Whisper ... | कुजबुज...

कुजबुज...

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ऐन सेवानिवृत्तीच्या दिवशी जिल्ह्यातील एका आरोग्य अधिकाऱ्यांनाही या वयवाढीच्या ‘सर्जरी’चा फायदा झाला. अनेक दिवस ते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असेच सांगत होते. ते खरेही ठरले; पण वयोमानामुळे त्यांच्या पदभाराला केवळ दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यावरच समाधान मानून एकेक दिवस मोजत त्यांनी दोन महिने कार्यकाळ गाजविण्याचा खटाटोप केला. शहरात नव्याने होणाऱ्या रुग्णालयाच्या कोनशिलेवर स्वत:चे नाव लागण्यासाठी नारळ फोडण्याची जोरदार तयारीदेखील केली. मात्र, आता हे दोन महिनेही संपत आले असून, ३१ जुलै रोजी ते सेवानिवृत्त होतील. त्यांच्या शाब्दिक बाणांवर अनेक जण कंटाळले होते; पण त्याविषयी बोलणार कोण, असे म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनीही दिवस काढले. अखेर आता ते सेवानिवृत्त होतील. कारण ‘मी पुन्हा येईन’ हे आता शक्यच नाही, अशी कुजबुज करीत कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहेत.

Web Title: Whisper ...