शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला अटक

By admin | Updated: March 1, 2015 00:09 IST

औरंगाबाद : आठ दिवसांपासून आजारी असलेल्या बैलावर उपचार करण्यासाठी एका पशुधन विकास अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये लाच घेतली.

औरंगाबाद : आठ दिवसांपासून आजारी असलेल्या बैलावर उपचार करण्यासाठी एका पशुधन विकास अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये लाच घेतली. ही वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील तक्रारदाराच्या शेतवस्तीवर करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.केशव भाऊराव निकाळजे (४८) असे अटक करण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ते कार्यरत आहेत.जानेफळ येथील रहिवासी तक्रारदार शेतकऱ्याकडे दोन बैल, गाय, वासरं अशी जनावरे आहेत. त्यापैकी एक बैल सात ते आठ दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी पशुविकास अधिकारी डॉ. केशव निकाळजे हे जानेफळ येथील शेतवस्तीवर गेले होते. तेथे त्यांनी बैलावर उपचार करण्यासाठी २ हजार १०० रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम २७ फेबु्रवारी रोजी घेऊन आल्यानंतर बैलावर उपचार करील, असे त्यांनी सांगितले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबादेतील कार्यालयात येऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच तक्रारदारासोबत पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हाही निकाळजे यांनी लाचेची मागणी करून २८ रोजी दुपारी शेतवस्तीवर येणार असून, तेथे रक्कम देण्याचे सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, कर्मचारी कैलास कामठे, दत्ता तरटे, व्यंकट गंगुलवार, सुनील फेपाळे, दिनेश जाधव यांनी साध्या वेशात तेथे तकारदाराच्या शेतवस्तीवर सापळा रचला. त्यावेळी निकाळजे यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपये लाच घेतल्यानंतर पकडण्यात आले. आरोपी विरोधात शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.