पद काय अन् काम कुठे !

By Admin | Updated: December 24, 2014 01:03 IST2014-12-24T00:04:26+5:302014-12-24T01:03:07+5:30

औरंगाबाद : बदल्या व प्रतिनियुक्त्यांमधील घोळ सतत चर्चेचा विषय ठरत असतानाच अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागातील तब्बल २७ कर्मचाऱ्यांची इतरत्र प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Where do the post and work! | पद काय अन् काम कुठे !

पद काय अन् काम कुठे !

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बदल्या व प्रतिनियुक्त्यांमधील घोळ सतत चर्चेचा विषय ठरत असतानाच अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागातील तब्बल २७ कर्मचाऱ्यांची इतरत्र प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य परिचर, आरोग्यसेवक, अशा तांत्रिक पदांवरील कर्मचाऱ्यांना सहज प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या २७ कर्मचाऱ्यांपैकी २१ जणांनी प्रतिनियुक्ती घेऊन औरंगाबादेत मुक्काम ठोकला आहे.
आरोग्य विभागाच्या मंगळवारी (दि.२३) झालेल्या मासिक बैठकीत सभापती विनोद तांबे यांनी हा विषय समोर आणला. पैठण येथील कुष्ठरोग तंत्रज्ञ पी.आर. लालसरे यांची प्रतिनियुक्ती तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. त्याशिवाय आरोग्य सहायक विलास वाघचौरे, आरोग्य परिचर एस.एस. वाघ, डब्ल्यू.व्ही. काळवणे, जनाबाई पवार, सय्यद जफरअली, एस.के. रिजवान, अनिल काकडे, दिलीप तायडे, बाळासाहेब दुबिले, प्रतापसिंग पाटील, एम.एम. पंडित, कैलास गुसिंगे, मोतीलाल लखेकर, अफजल शरीफ, आरोग्यसेवक एस.एस. तामगडे, एस.एस. महाजन, मिलिंद गोमटे आणि आरोग्य विस्तार अधिकारी शिवाजी घुगे आदी तांत्रिक पदांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातून जिल्हा परिषदेच्या इतर विभागात प्रतिनियुक्ती करून घेणारे ४ कर्मचारी आहेत.
बैठकीला आरोग्य समिती सदस्य शारदा गिते, अनिता राठोड, बाबूराव चोपडे, रवींद्र शिसोदे, सुदाम मोकासे, गोदावरी शिंदे यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बाविस्कर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Where do the post and work!