शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संचालक स्वत: वर्ग घेतात तेंव्हा़़़

By admin | Updated: January 7, 2015 01:02 IST

बीड : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक सर्जेराव जाधव यांनी येथील चंपावती विद्यालयात मंगळवारी वार्षिक तपासणी केली.

बीड : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक सर्जेराव जाधव यांनी येथील चंपावती विद्यालयात मंगळवारी वार्षिक तपासणी केली. यावेळी त्यांनी वर्ग घेत गुरुजींची भूमिकाही निभावली. शालेय व्यवस्थापनाला सूचना करीत त्यांनी शाबासकी दिली़ सकाळी परिपाठालाच संचालक जाधव यांनी हजेरी लावली. त्यानंतर ते तडक एगा वर्गात गेले. संचालक दर्र्जाच्या अधिकाऱ्याने वर्गावर जाऊन खडू हातात घेत अध्यापन केल्याने शिक्षकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी जाधव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवादही साधला. त्यांनी सर्व विभागांना भेटी देऊन आढावा घेतला. पिण्याचे पाणी तसेच खिचडीची त्यांनी स्वत: चव चाखली. यावेळी त्यांनी प्रयोगशाळेत पाणी तपासणी करावी, अशा सूचना दिल्या. सायंकाळी सहा वाजता त्यांनी शिक्षकांची बैठक घेतली़ शिक्षणाधिकारी (मा.) लता सानप, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, विजय हजारे, अधीक्षक मोहन सिरसट, जयलाल राजपूत उपस्थित होते. अन् शिक्षणाधिकाऱ्यांना साक्षात्कार चंपावती शाळेत शिक्षकाला रुजू करण्यावरुन संस्था पदाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सानप यांनी शाळेतील ५० हून अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रोखून धरले होते. त्यामुळे ऐन दिवाळीत शिक्षकांना उधारी- उसणवारी करावी लागली. शिक्षकांनी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे धाव घेतली होती. तेंव्हा लता सानप यांनी ‘चंपावती’मध्ये शैक्षणिक वातावरण नाही... असे सांगून नाराजी व्यक्त केली होती. त्याच सानप यांनी मंगळवारी संचालकांसमोर चंपावतीच्या शालेय व्यवस्थापनावर स्तूतीसुमने उधळली. त्यामुळे अडीच महिन्यांतच सानप यांना काय साक्षात्कार झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. संचालकांचा सानप यांना सवाल संचांलक जाधव यांनी संगणक विभागाला भेट दिली. तेथे चाळीस संगणक होते;परंतु एकही संगणक माध्यमिक विभागाने उपलब्ध केलेले नव्हते. सर्व संगणक संस्थेनेच खरेदी केले होते. शासकीय योजनेतून संगणक का दिले नाही? असा प्रश्न जाधव यांनी त्यांना केला. यावेळी लता सानप निरुत्तर झाल्या. (प्रतिनिधी)