शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकाने शेअर केलेली ‘APK’ फाइल करतेय बँक खाते रिकामे

By सुमित डोळे | Updated: October 8, 2024 15:21 IST

एक बेसावध क्लिक मनस्तापाला कारणीभूत; तीन महिन्यांत ३४ जण पडले बळी, खाजगी डेटासह बँक खाते होतेय रिकामे

छत्रपती संभाजीनगर : संवादासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे व्हॉट्सॲपचे करमणूक करणारे ग्रुप आता असुरक्षित झाले आहे. काही ग्रुपमध्ये अचानक एपीके (APK) फाइल शेअर होत आहेत. या फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइलचा ताबा सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊन बँक खाते रिकामे होत आहे. शिवाय, मोबाइलमधील तुमचा खासगी डेटाही चोरला जात आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास ३४ जणांनी सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.

६३ वर्षीय वृद्धाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकावरून एसबीआय बँकेच्या नावे ॲप वापरल्यास १० हजारांचे अवॉर्ड मिळत असल्याचे मेसेज आले. फोटोसोबत एक एपीके फाइल होती. ती इंस्टॉल करताच मोबाइलचा डेटा सायबर गुन्हेगारांनी मिळवला आणि क्षणात बँक खात्यातून ३ लाख ७२ हजार रुपये लंपास झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सायबर गुन्हेगारांचा हा नवा फसवणुकीचा प्रकार सुरू आहे. देशातील नामवंत बँक, प्रसिद्ध दागिन्यांच्या कंपन्या, ऑनलाइन शॉपिंगच्या डिस्काऊंट कोडच्या नावे या एपीके फाइल ग्रुपवर शेअर केल्या जात आहेत.

APK म्हणजे काय?
ॲंड्राॅइड पॅकेज किट म्हणजे एपीके ओळखले जाते. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते. एपीके फाइल हानीकारक नसली, तर त्याचा स्त्रोत मात्र अत्यंत धोकेदायक असू शकतो. प्ले स्टोर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या अशा APK फॉरमॅट मधील फाइल असुरक्षित असतात.

नेमके काय होते
- तुम्ही एपीके ॲपवर क्लिक करताच ॲप इंस्टॉल होते. जे ॲप लिस्टमध्ये दिसत नाहीत.
मोबाइल धारकाला अज्ञात स्त्रोतांकडून (फ्लॅश मेसेज) विविध मेसेज सुरू होतात. सदर ॲप कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, कॉन्टॅक्स, एसएमएस, गॅलरीची परवानगी मागते.
- तुमचे सर्व मेसेज एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात.
- अशा फाइल काही केबी (केबी) साइजच्या असतात.

हे आवश्य करा
- व्हॉट्सॲपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.
- अनोळखी ॲप इंस्टॉल झाल्यास पहिले फ्लाइट मोड ऑन करा.
- त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसिट करा.
- तत्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमMobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप