शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील पदांवर ‘पश्चिम’चा पगडा

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

औरंगाबाद : महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर २०१० पासून ‘पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाचाच पगडा राहिलेला आहे.

 औरंगाबाद : महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर २०१० पासून ‘पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाचाच पगडा राहिलेला आहे. ६ जून रोजी होणार्‍या सभापती निवडणुकीत आपल्याच मतदारसंघातील नगरसेवक विजयी व्हावा यासाठी ‘पश्चिम’ने पुन्हा जोर लावण्यास सुरुवात केली आहे. मागील ४ वर्षांत मनपातील सर्वाधिक दालने ‘पश्चिम’ मतदारसंघाने बळकाविली आहेत. यावेळी पद मागण्यामागे कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत ‘पश्चिम’ने शिवसेना उमेदवाराला मोठे मताधिक्य दिले आहे. ते मताधिक्य आमदार व पदाधिकार्‍यांनी कडक उन्हात घेतलेल्या परिश्रमांमुळे मिळाल्याचा दावा केला जात आहे. मध्य मतदारसंघातील नगरसेवक जगदीश सिद्ध यांना सभापतीपद देण्यासाठी सर्व नेत्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे ते पदावर दावा करीत आहेत, तर ‘पश्चिम’ मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांचे समर्थक नगरसेवक विजय वाघचौरे यांचे नाव अचानक पुढे आले आहे. कारण बालाजीनगरचे नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये सभापतीपद देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देताना त्याचा विचार होईल. आगामी विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सोबत घेऊन चालणारा नगरसेवक सभापतीपदावर बसवावा, अशी मागणी युतीच्या गोटातून होत आहे. परंतु शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे सभापतीपदासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. ६ जून रोजी निवडणूक होणार आहे. अंदाजे ३ जूनपासून अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवात होईल. या निवडणुकीवरून सेनेत गटबाजीला पुन्हा उधाण येऊ शकते. २०१० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘पश्चिम’ मतदारसंघात महापौरपद गेले. माजी महापौर अनिता घोडेले यांना ती संधी मिळाली. त्यानंतर सभागृहनेता गिरजाराम हाळनोर यांच्याकडे गेले. त्यानंतर त्र्यंबक तुपे व राजू वैद्य सभागृहनेता झाले, तर गटनेतापद गजानन बारवाल यांच्याकडे गेले. त्यानंतर सुशील खेडकर यांना सभागृहनेता केले. यावेळी सभापतीपदासाठी पुन्हा ‘पश्चिम’ने लॉबिंग सुरू केले आहे. त्या तुलनेत मध्य विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक जगदीश सिद्ध हे औटघटकेचे सभापती झाले. नंतर विकास जैन सभापती झाले. स्थायी समिती सदस्यांव्यतिरिक्त आ. प्रदीप जैस्वाल समर्थकांना मनपात पद मिळाले नाही. आॅगस्ट २०१२ मध्ये आ. जैस्वाल सेनेत परतले. मात्र, त्यांच्या शहर प्रगती आघाडीला सेनेने स्वीकारलेले नाही. तसेच आ. जैस्वाल यांनादेखील सेनेतील गटबाजीचा सामना करावा लागत आहे. मध्य मतदारसंघातून सभागृह नेतेपदी किशोर नागरे यांची वर्णी लागेल, असे वाटले होते. मात्र, तो निर्णयही रखडला आहे. पूर्व मतदारसंघाला महापौर वगळता कुठलेही पद मिळालेले नाही.