दैठण्यात पालखीचे स्वागत

By Admin | Updated: June 21, 2014 00:49 IST2014-06-20T23:44:43+5:302014-06-21T00:49:54+5:30

दैठणा : आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून गजानन महाराज यांची पालखी दैठणा येथे आली असता भाविकांनी स्वागत केले.

Welcome to Peth | दैठण्यात पालखीचे स्वागत

दैठण्यात पालखीचे स्वागत

दैठणा : आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून गजानन महाराज यांची पालखी दैठणा येथे आली असता भाविकांनी स्वागत केले.
तुकाराम नामदेव कच्छवे, अशोक सोनाजी चिनके यांनी या पालखीचे स्वागत केले. त्यानंतर मृदंगाच्या गजरात पालखी गावातून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली. या पालखीचा मुक्काम जिल्हा परिषदेच्या शाळेत झाला. संतोष चव्हाण, अशोक चिनके यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या पालखीसोबत ७०० वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीमध्ये हत्ती नसल्यामुळे बालकांची नाराजी झाली. गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथून ५ जून रोजी निघाली. ७ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. चार दिवस मुक्काम करून शेगावकडे परतीच्या मार्गाने निघून २ आॅगस्ट रोजी ही पालखी शेगावमध्ये दाखल होणार आहे. तुकाराम कच्छवे यांनी वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. ही पालखी २१ जून रोजी गंगाखेडकडे रवाना होणार आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Welcome to Peth