शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तार्इंच्या पालखीचे उत्साहात स्वागत

By admin | Updated: June 27, 2014 00:10 IST

बीड: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुक्ताई पालखीचे गुरूवारी बीड शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील चौका-चौकात आतषबाजी करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले.

बीड: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुक्ताई पालखीचे गुरूवारी बीड शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील चौका-चौकात आतषबाजी करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. याप्रसंगी सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले होते.आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताई नगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मुक्ताई पालखीचे बीडमध्ये आगमन झाले. यावेळी पंचक्रोशितील भाविकांनी शहरातील साठे चौक, सुभाष रोड भागात गर्दी केली होती. पालखीच्या दर्शनासाठी महिलांची देखील मोठी गर्दी होती. ज्ञानोबा- तुकाराम च्या जयघोषात बीड शहर दुमदुमून गेले होते. पालखीत सहभागी भाविकांच्या चहा-पाण्याची व्यवस्था शहरातील विविध भागात भाविकांनी केली होती. आदर्श मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने मुक्ताईच्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. चोख बंदोबस्तात पालखीतील वारकऱ्यांना सुभाष रोड मार्गे माळीवेस येथील हनुमान येथे पोहचविण्यात आले. येथे वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीधरपंत उर्फ गोविंद पंत हे मुक्तार्इंचे आजोबा असून शनिवारी सकाळी मुक्तार्इंची पालखी गोविंदपंतांच्या पालखीस्थळी दाखल होईल. यावेळी मुक्ताई व त्यांचे आजोबा श्रीधरपंत यांची भेट होईल. मुक्तार्इंच्या पादुकांचे पूजन करण्यात येणार असून साडीचोळीचा आहेर दिला जाणार आहे. त्यानंतर मुक्तार्इंच्या पालखीचे प्रस्थान होईल. (प्रतिनिधी)वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणीस्व.गंगाभिषणजी बियाणी सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पालखीतील वारकऱ्यांची नवगण प्लाझा येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. पूजा बियाणी, डॉ. विजय चरखा, डॉ. शाम झंवर, डॉ. सचिन जेथलिया, डॉ. शैलेश बाहेती, डॉ. बी.जी. झंवर, डॉ. संतोष लड्डा यांनी परिश्रम घेतले. बालकिशन बियाणी, कैलास बियाणी, भगीरथ बियाणी उपस्थित होते.