शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

करमाडच्या आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 20:44 IST

सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

शेंद्रा : दुष्काळाचा परिणाम पोळा सणावर दिसून येत असून, सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यावरुन दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शेती, पशुधन आणि शेतकरी यांचे अतूट नाते आहे. यांत्रिकीकरण झाले असले तरी अजूनही पशुधनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा असणारा त्याच्या परिवारातील सदस्य म्हणून बैलाची ओळख आहे. अशा बैलाची पुज्याकरून ऋण फेडण्याचे काम पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी करतात. या सणानिमित्त बैलांना सजविण्यात येते.

यासाठी शेतकरी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात. परिसरातील ३० गावांतील शेतकरी करमाडच्या आठवडी बाजरातून बैलांना सजवण्याचे साहित्य खरेदी करतात. परंतु यावर्षीच्या आठवडी बाजारात शेतकºयांनी साहित्य खरेदीस हात आखडता घेतल्याचे दिसत आहे. ईच्छा असूनसुद्धा पैशांअभावी ही परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे. सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारात ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

व्यापाºयांनी बैलांच्या शिंगाला लावण्यासाठी आॅइल पेंटचे कलर , चमचमीत बेगडे , गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घागरमाळा, बाशिंग , घुंगरू, गोंडे , घंट्या, ताग, सुती आदी वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु याची विक्रीच समाधानकारक झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.बैलांना धुण्यासाठी टँकरचे पाणीऔरंगाबाद तालुक्यात शेकटा, देमणी वाहेगाव, कवडगाव , गोलटगाव अशा अनेक गावांतील तलावात, विहरित थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे बैलांना धुण्यासाठी टँकरने विकत पाणी आणावे लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार