शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराचे ग्रहण सुटेना !

By admin | Updated: August 2, 2014 01:48 IST

माजलगाव : शहरातील आठवडी बाजार भरत असलेल्या सध्याच्या जागेवरून तो हटवून दुसरीकडे भरवावा हा न्यायालयाने एक वर्षापूर्वी आदेश दिलेला आहे.

माजलगाव : शहरातील आठवडी बाजार भरत असलेल्या सध्याच्या जागेवरून तो हटवून दुसरीकडे भरवावा हा न्यायालयाने एक वर्षापूर्वी आदेश दिलेला आहे. तो अद्यापही हटविला नाही. २० जुलै रोजी जाहीर प्रगटनाद्वारे बाजार हटविण्यात येणार असल्याचे सांगूनही न.प.ने बाजार हटविलेला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी शेतकरी व न्यायालयाची दिशाभूल केली. आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजाराचे न.प.च्या चुकीमुळे ग्रहण सुटेनासे झाले आहे. माजलगाव शहरात आठवड्यातून दोनदा बाजार भरविला जातो. वीस वर्षांपूर्वी हा बाजार हनुमान चौकाजवळ भरविण्यात येत होता. मात्र या ठिकाणी जागा पुरत नसल्याने हा बाजार गजानन मंदिर रोडवर भरविण्यात येऊ लागला. या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. या बाजार रस्त्यावर अनेक शासकीय कार्यालयांचा संपर्क येतो. त्यामुळे येथून वाहनांसह सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रहदारीच्या रस्त्यावरच बाजार भरविण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. सध्याच्या ठिकाणी न.प.कडून कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. याचा त्रास व्यापारी व शेतकऱ्यांना होत आहे. हा बाजार हटविण्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हा बाजार हटवावा, असे एक वर्षापूर्वी न.प.ला आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. न.प.ने दिशाभूल केली म्हणून १६ जुलै रोजी न्यायालयाकडे साखरे यांनी अटक वॉरंट काढावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर २० जुलै रोजी वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटन देण्यात आले. २७ जुलैला सर्व्हे नं. ३८० मधील जागेत बाजार भरणार असल्याचे नमुद केले होते. मात्र अद्यापही बाजार भरविण्यात आलेला नाही.प्रभारी मुख्याधिकारी अब्दुल सत्तार म्हणाले, न.प.ने जाहीर प्रगटन दिले होते. व्यापारी व शेतकरी सर्व्हे नं.३८० मध्ये २७ जुलैला आले नाहीत. येत्या रविवारी पोलीस बंदोबस्तात हा बाजार हटविण्यात येईल. (वार्ताहर)