शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कोकीळा नामशेष होण्याच्या मार्गावर; पक्षीप्रेमींमध्ये चिंता

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

नांदेड : कोकिळेचा सुमधुर व मन प्रसन्न करणारा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो़ उन्हाळ्यात सकाळी कानावर पडणारा हा

नांदेड : कोकिळेचा सुमधुर व मन प्रसन्न करणारा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो़ उन्हाळ्यात सकाळी कानावर पडणारा हा आवाज सायंकाळी ७ पर्यंत ऐकावयास मिळत असल्याने रूक्ष वाटणाऱ्या उन्हाळ्यात या स्वरामुळे मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो़ मात्र मंजुळ आवाजाचा हा पक्षी वातावरण बदलातील परिणामाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़वैज्ञानिकांनी याबाबत केलेल्या संशोधनातून धोक्याच्या पातळीवर असलेल्या पक्ष्यांची नुकतीच यादी जाहीर केली़ कपुकयुलिडी कुळातील कोकीळ पक्षी हा भारतात आढळतो़ कावळ्याएवढाच पण थोडा सडपातळ असणाऱ्या या पक्ष्याचे उन्हाळ्यात सर्वत्र दर्शन होते़ जसजसा दिवस चढत जातो, तसतसा कोकिळेच्या स्वराला साज चढतो़ ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ, आमराईतून येणारा कोकिळेचा मंजुळ स्वर अनेकांना भुरळ घालतो़ मात्र कोकिळेचे यंदा उन्हाळ्यातील आगमन लांबणीवर पडले असल्याचे दिसून येते़ कोकीळा पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच तिला कंठ फुटतो आणि ती गाऊ लागते़ श्रावण महिन्यापर्यंत तिची गाणी ऐकू येतात़ हिवाळ्यात मात्र हा पक्षी मौन बाळगतो़ मादी कोकिळेला गाता येत नाही़ तर कोकिळा हा त्याचा पंचम स्वरामुळे अत्यंत लोकप्रिय व आवडता पक्षी आहे़ पंचम स्वरातील कोकिळेची आर्तता ऐकणाऱ्याला लुभावते़ गीतकारांनी कोकीळ पक्ष्यावर भरभरून लिहिले आहे़ कवी व लेखकांनी आपल्या साहित्यातून कोकिळेचा मंजुळ स्वरांचा गोडवा मांडला आहे़या पक्ष्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे हा पक्षी कधीही आपले घरटे बांधत नाही़ मादा कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते़ तसेच घरट्याजवळ लपून बसते़ कोकीळ व कावळा यांचे वैर असल्याने कावळा त्यावर तुटून पडतो़ तेव्हा कोकीळ कावळ्याला हुलकावण्या देत घरट्यापासून दूर नेते़ दरम्यान, मादा कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी पाहून कोकिळेला काम फत्ते झाल्याचे कळते़ पिल्ले बाहेर आल्यावरच कावळाच कोकिळेच्या पिल्लांचे पालन करतात़ ग्रामीण भागात कोकिळेचा सूर निनादतो़ प्रदूषणाचा फटका कोकीळ पक्ष्यांनासुद्धा बसत आहे़ संवर्धनाची गरज व्यक्त होत आहे़ वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम या पक्ष्याच्या संख्येवर होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे़ दिवसेंदिवस घटणारी कोकिळेची संख्या पक्षीप्रेमींमध्ये चिंतेची बाब ठरत आहे़ संवर्धनाकरिता जनजागृती आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)