शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 23, 2014 00:16 IST

मधुकर सिरसट- केज शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालय व परिसरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे.

 मधुकर सिरसट- केज शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालय व परिसरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे. विंधन विहिरीला पाणी येत नसल्याने शासकीय निवासस्थानात राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांसह रुग्ण व नातेवाईकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी मिळून शंभरहून अधिक कर्मचारी रुग्णालय परिसरातील शासकीय निवासस्थानात राहतात. रुग्णालय परिसरात त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक विंधन विहीर घेण्यात आली असून, पंधरा दिवसांपासून या विहिरीचे पाणी संपल्यामुळे पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. याचा फटका उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचार्‍यांसह रुग्ण व नातेवाईकांना बसू लागला आहे. पैसे खर्चून टँकरद्वारे पाणीपुरवठा या प्रकरणी नुकतेच वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झालेले डॉ. अशोक थोरात यांच्याशी याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, पैसे खर्च करुन टँकरद्वारे कर्मचारी आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रुग्णालय केज हद्दीत नसल्याने अडचणी केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी रामदास कोकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पाणीटंचाई दूर करण्यासाठी व नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला आहे. परंतु केज येथील उपजिल्हा रुग्णालय हे केज नगर पंचायतीच्या हद्दीत येत नाही. ते पिसेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याठिकाणी शासनाचा निधी पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. केज हद्दीत हे रुग्णालय असले असते तर येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असते. येथील उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट जाणवत असला तरी ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. रेफर रुग्णालय फलक पुसणार येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू होताच डॉ. अशोक थोरात यांचा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गलांडे, काँग्रेसचे राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, भाजपाचे जिल्हा चिटणीस दत्ता धस, शहराध्यक्ष प्रकाश गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे व इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अशोक थोरात यांचा रुजू झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी डॉ. थोरात म्हणाले, महिला व प्रसूती तज्ज्ञ रुग्णालयाला मिळाल्यामुळे लवकरच कायमस्वरुपी भूलतज्ज्ञाची नियुक्ती येथे होणार आहे. त्यामुळे प्रसुतीचे आणि इतर रुग्णांना स्वाराती रुग्णालयात नेहमी ‘रेफर’ करावे लागत होते. यापुढे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, प्रसुती रुग्णालयातच होतील. ‘रेफर’ रुग्णालय हा फलक पुसून टाकला जाईल. वैद्यकीय अधीक्षक म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेले डॉ. अशोक थोरात यांनी रुजू होताच विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचारी, रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईबाबतही त्यांनी ठोस उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी अधिकार्‍यांसह रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.