शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटी ३६ लाखांचा पाणी आराखडा

By admin | Updated: January 16, 2016 23:52 IST

नायगाव बाजार ; तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने दोन टप्प्यात ३ कोटी ३६ लाखांचा कृती आराखडा मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे.

नायगाव बाजार ; तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने दोन टप्प्यात ३ कोटी ३६ लाखांचा कृती आराखडा मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे.२०१५ मध्ये ३६५ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत ३९ टक्केच झाला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यातील सिंचन, पाझर तलाव, नदी-नाले, बोअर, विहिरीतील जलसाठा वाढला नाही. त्यातच मानार भरला नसल्याने रबीसाठी पाणी आले नाही. त्यामुळे अनेक गावे पाणीटंचाईच्या कचाट्यात सापडली. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली तर काही ठिकाणी अधिग्रहण करुन त्यावर मात करण्याचा प्रयत्न होतो आहे. एप्रिल, मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई आताच जाणवू लागली आहे. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी आ. वसंतराव चव्हाण, जि.प. व पं.स. सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा, सरपंच यांची बैठक घेऊन सर्व बाबींचा विचार करुन कृती आराखडा तयार करण्यात आला. तो दोन टप्प्यात असून मंजुरीसाठी जिल्हा पातळीवर तो पाठवला. त्यात जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी २ कोटी २४ लाख ४६ हजारांचा आराखडा आहे. त्यात २१ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यावर २७ लाख खर्च होणार आहेत. २ गावांत पुरक नळयोजना ६ लाख, नळयोजना विशेष दुरुस्ती १५ गावांत खर्च ३२ लाख, ५ गावांत विहिरीतील गाळ काढणे ४ लाख, ३४ गावांत विंधन विहिर विशेष दुरुस्ती ७ लाख ६२ हजार, ८१ गावांत बोअर व विहीर अधिग्रहण करणे ६० लाख ८४ हजार, ९१ गावांत नवीन विंधन विहीर घेणे ८७ लाख असा २ कोटी २४ लाख ४६ हजार खर्च येणार आहे.