शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

फारोळ्यात लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

चितेगाव : फारोळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळील मनपाच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात असून ही नदी दुथडी भरून वाहत आहे.

चितेगाव : फारोळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळील मनपाच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात असून ही नदी दुथडी भरून वाहत आहे. याकडे मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.जायकवाडी प्रकल्पात ५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून मनपा पाणीटंचाई असल्याने शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते; परंतु मनपाच्या जलवाहिनीतून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र फारोळा ते औरंगाबादपर्यंत दिसून येत आहे. फारोळा ते म्हारोळा या नदीजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठे भगदाड पडल्याने ही नदी दुथडी भरून वाहू लागली. या पाण्यावर शेतकऱ्यांच्या अनेक विहिरी तुडुंब भरल्या असून तीन ते चार कि़मी. पाणी वाहत आहे. यावर फारोळा येथील १० ते १२ वीटभट्टयांसाठी हे पाणी सर्रास वापरले जाते. या नदी पात्राजवळ नव्याने खोदकाम करण्यात येत असलेल्या विहिरींना भरमसाठ पाणी लागले आहे. नदीजवळील अनेक विहिरींवरून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यामुळे टँकरवाल्यांची चांदी होत आहे. हे पाणी जवळील कारखाने, बांधकाम व शेतीसाठी वापरले जाते. शुद्धीकरण होऊन आलेल्या पाण्याची मोठी नासाडी होत असून ५० एच.पी. पर्यंत पाणी वाहून जात आहे. नदीकाठावरील पाचशे हेक्टर जमीन या पाण्यामुळे ओलिताखाली आली, तर म्हारोळा गावाजवळील कृषी विभागाचा साखळी बंधारा तुडुंब भरला. या व्हॉल्व्हमधून येणाऱ्या पाण्यावर लोडिंग रिक्षा व टँकरवाले पाणी विक्री करीत आहेत. सर्वत्र विहिरी कोरड्या पडल्या असून या नदीवरील विहिरींना मात्र मुबलक पाणी आले. याचे संशोधन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. अधिकारी रोज या रस्त्याने ये-जा करतात; परंतु त्यांना फारोळा, चितेगाव, ब्रुकबाँड तांडा, गेवराई, तांडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या सर्व ठिकाणी तीनच्या वर एच.पी. विद्युत मोटार चालेल एवढे पाणी दिवस-रात्र चोरी होत असताना दिसत नाही. (वार्ताहर)