तांत्रिक सहायकांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:46+5:302021-02-05T04:13:46+5:30

शिवाजीनगर ते एन-४ रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे औरंगाबाद : शिवाजीनगर ते अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे एन-४ ते सिडको बसस्टॅण्डकडे जाणाऱ्या ...

Warning of technical assistants fasting | तांत्रिक सहायकांचा उपोषणाचा इशारा

तांत्रिक सहायकांचा उपोषणाचा इशारा

शिवाजीनगर ते एन-४ रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे

औरंगाबाद : शिवाजीनगर ते अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे एन-४ ते सिडको बसस्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिमेंट काँक्रीटीकरणातून या रस्त्याचे काम होत असून काही ठिकाणी विद्युत खांबांमुळे रस्त्याचे काम कमी-अधिक झाले आहे.

पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी

औरंगाबाद : विश्रांतीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन वाटमारी करणे, अंधारात लूटमार करण्याच्या घटना वाढत आहे. रेल्वेस्टेशन लगत पोलीस चौकी प्रस्तावित असून ती तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच त्या भागात पथदिवे बसविण्याचीदेखील मागणी होत आहे.

क्रांतीचौक उड्डाणपुलावर पडले खड्डे

औरंगाबाद: क्रांतीचौक उड्डाणपुलावर वळणाला खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालकांना खड्डे वगळून वाहने चालवावी लागत आहेत. पुलावरील खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जयभवानीनगरमध्ये बसविले विद्युत रोहित्र

औरंगाबाद: जयभवानीनगर परिसरातील ओम शांती हाऊसिंग सोसायटीतील खुल्या जागेलगत विद्युत रोहित्र (डीपी) बसविण्यात आली आहे. उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, रवी गायकवाड, शिवाजी नलावडे, विष्णू पुंगळे, उध्दव चौधरी आदींच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली.

एड्सग्रस्त मुलांना शालेय साहित्याचे वाटप

औरंगाबाद: भाजयुमोच्या क्रांतीचौक मंडळातर्फे एड्सग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी राज वानखेडे, राजेंद्र साबळे, अक्षय मात्रे, मनोज भारस्कर आदींची उपस्थिती होती.

बानाईच्या जिल्हाध्यक्षपदी ससाणे

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) च्या जिल्हाध्यक्षपदी पीडब्ल्यूडीचे सेवानिवृत्त अभियंता अशोक ससाणे यांची निवड करण्यात आली. मावळेत अध्यक्ष कार्यकारी अभियंता एस.बी.भगत यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. शहानूरमियाँदर्गा परिसरातील बानाईच्या कार्यालयात नवनियुक्त सदस्यांचा पदग्रहण सोहळा झाला.

जाफरगेट परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करा

औरंगाबाद : आठवडी बाजार आणि जाफरगेटलगतचा रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. सदरील रस्ता चिखलमय झाला असून दुचाकी घसरून पडत आहेत. त्या ऐतिहासिक दरवाजाच्या संवर्धनाचे काम सध्या सुरू असून लगतचा रस्तादेखील चांगला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Warning of technical assistants fasting