शीतपेयांबाबत सावधानता महत्त्वाची

By Admin | Updated: May 25, 2014 01:11 IST2014-05-25T01:03:37+5:302014-05-25T01:11:52+5:30

अर्धापूर: मे महिन्यात तापमानाचा पारा चढता असतो. उन्हाची दाहकता काहीशी कमी करण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शीतपेयांची दुकाने सजली आहेत.

Warning is important | शीतपेयांबाबत सावधानता महत्त्वाची

शीतपेयांबाबत सावधानता महत्त्वाची

अर्धापूर: मे महिन्यात तापमानाचा पारा चढता असतो. उन्हाची दाहकता काहीशी कमी करण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शीतपेयांची दुकाने सजली आहेत. सध्या शीतपेयांना पूर्वीप्रमाणे मागणी नसली तरीही नागरिकांनी या कृत्रिम थंडपेयापासून सावध राहणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालय परिसर व चौकामध्ये विक्रेत्यांच्या हातगाड्यावर रंगीबेरंगी बर्फाचे गोळे विकणारे विक्रेते आता कमी झाले आहेत. शाळांना सुट्या लागल्या आहेत. बर्फांचे पेय, विविध फळांचे आणि उसाचे रस वा खाद्यपदार्थ घेताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना अशा पदार्थांपासून दूर ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांद्वारे केले जात आहे. ज्यूस, लस्सी, आईस्क्रीम, उसाचा रस या पदार्थांना ग्राहकाची मागणी वाढली आहे. दिवसाचे उन्हाचे चटके वाढल्याने दुपारी शीतपेयाच्या दुकानावर गर्दी होऊ लागली आहे. शहरी भागातील चौकासह ग्रामीण भागातही शीतपेयांची दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसतात. अननस, मोसंबी, संत्री, स्ट्रॉबेरी, मॅनगो यासह अनेक फळांच्या फ्लेव्हरमध्ये ज्यूस आणि मिल्क शेक मिळत आहे. बाटलीबंद शीतपेयापेक्षा ज्यूस, मिल्कशेक, उसाचा रस अशा शीतपेयांना अधिक मागणी आहे. पण हे पेय बनविताना त्यात शुद्ध पाणी व शुद्ध बर्फाचा वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक पदार्थ टाकले जावू नयेत, अन्यथा उन्हात दिलासा देणारी ही पेय धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)

Web Title: Warning is important