शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:35 IST

वाल्मीक कराड जेलमधून आजही सक्रीय; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या दाव्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  यांच्या हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड आणि आ.धनंजय मुंडेंचे संबंध सर्वश्रुत आहेत. कराड आजही सक्रिय आहेत. माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला कराडचा फोन आला होता, असा खळबजनक दावा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपण तीन महिन्यापूर्वी केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या बैठकीवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पत्र पाठवून आक्षेप घेतल्याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले की, त्याच खात्याचे मंत्री बैठक घेऊ शकतात असे नाही.  काम असेल तर दुसऱ्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री देखील बैठक घेऊ शकतात. मात्र धोरण काय ते माहिती नाही. ही लोकशाहीमधील यंत्रणा आहे. याला स्वीकारली पाहिजे. दोघांनी पत्र लिहिणे हे चूक आहे. फोन करून किंवा भेटून बोलले पाहिजे होते. रेकॉर्डवर पत्र लिहिणे हे योग्य नाही असे दानेव यांनी नमूद केले.

जेलमधून कराडचा फोनउच्च न्यायालयाने धनंजय मुंडेना कृषी साहित्य खरेदीत क्लीन चीट मिळाली आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की, कृषिविभागात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालेला आहे. आताही वाल्मीक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मीक कराडचा फोन आला होता. मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. चौकशी झाली पाहिजे.

लाभार्थ्यांची चौकशी करालाडकी बहिण योजनेत १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे समजले. हे प्रकार अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीच्या काळात ,निवडणुकीसाठी ही योजना आणली होती. आता हे समोर येत आहे , याची चौकशी झालीच पाहिजे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेwalmik karadवाल्मीक कराड