शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून वृद्धा जागीच ठार

By admin | Updated: September 26, 2016 00:04 IST

तामलवाडी : सलग चार तास पडलेल्या दमदार पावसाने घराची भिंत कोसळून वृद्धा जागीच ठार, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

तासगाव : सांगली येथे २७ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तासगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने जोरदार कंबर कसली आहे. तालुक्यातील गावन् गाव मराठामय झाल्याचे चित्र आहे. गावा-गावात बैठकांचा धडाका सुरु असून, मोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे. या मोर्चासाठी अनेक जाती-धर्माच्या संघटनांकडून पाठिंबा दिला जाता असून, मोर्चासाठी अनेक संस्थांकडून सुटी जाहीर केली जात आहे. सांगली येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावा-गावात बैठका घेण्यात येत आहेत. यासाठी शहरातील तरुण प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विविध चार संघ तयार करण्यात आले आहेत. हे संघ क्रांती मोर्चाचे महत्त्व, काम, उद्देश याबाबत माहिती देण्याचे काम करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज चार ते पाच गावात हे संघ जाऊन याबाबत बैठका घेत आहेत. बहुतांश गावांतून या बैठका झाल्या असून बैठकीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात मराठामय वातावरण तयार झाले आहे. तसेच या बैठकांमधून आर्थिक मदतीची घोषणा केली जात आहे. प्रत्येक बैठकीला आठ ते दहा हजार रुपयांची मदत जमा होत असल्याचे सांगण्यात आले. मराठी क्रांती मोर्चाला तासगाव तालुक्यातील मुस्लिम समाज, लिंंगायत समाज, माळी समाज, गुरव समाज, जैन समाज, तसेच घिसाडी समाजाच्यावतीने पाठिंंबा देण्यात आला आहे. मोर्चासाठी जाणाऱ्या लोकांना तासगाव ते सांगली मार्गावर विविध समाज तसेच गावांतून पाण्याच्या बाटल्या, सरबत, चहा, नाष्टा वाटप करण्यात येणार आहे. तासगाव येथील विटा नाका तसेच चिंंचणी नाका येथे मुस्लिम समाजाच्यावतीने पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र या बाटल्या कोठेही अन्यत्र न फेकता कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील वर्गा-वर्गात जाऊन आयोजकांनी या मोर्चाचे महत्त्व तसेच जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचा मोठा पाठिंंबा मिळत असल्याचे सांगितले. तासगावहून सांगली येथे जाण्यासाठी विशेषत: महिलांच्या सोयीसाठी तासगावमधून अनेक वडापचालक तसेच मालवाहतूक संघटना आपली वाहने चौका-चौकात उभी करणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. मोर्चासाठी तालुक्यातील प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते आणि वकील यांचे संघ तयार करण्यात आले आहेत. यातील प्रमुख दोघांवर सर्वांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये नगरपालिका शिक्षण मंडळही सहभागी असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चासाठी तालुक्यातून लाखांहून अधिक लोक जाण्याची शक्यता आहे. याचे नियोजन व्यवस्थित होण्याकरिता तासगाव शहरात जवळपास ५० स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. शिवाय गावपातळीवरही त्या त्या संघटनांनी स्वयंसेवकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)