शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी गावनिहाय आराखडा

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद महापूर, भूकंप आणि दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्याला सुरुवात करता

सुनील कच्छवे, औरंगाबादमहापूर, भूकंप आणि दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्याला सुरुवात करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग उपलब्ध साधनांचा गावनिहाय आराखडा तयार करीत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात आणि जवळपास भागात उपलब्ध साधनांची तसेच सुविधांची इत्थंभूत माहिती मागविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुघर्टनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. यंदाही जिल्हा प्रशासनाने असा आराखडा तयार केला आहे. त्यात महानगरपालिका, नगर परिषदा तसेच जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध बोटी, अग्निशमन वाहन, जीवरक्षक साहित्याची माहिती असते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने आता याही पुढे जाऊन प्रत्येक गावाच्या दृष्टीने अशी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यात कोणत्या गावात नैसर्गिक संकटाचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्या गावात तातडीने मदत कुठून पोहोचू शकते, जवळपासच्या कोणत्या गावात कुणाकडे क्रेन, जेसीबी आहे, सर्वांत जवळ कोणत्या ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स आहे, त्यांचे मोबाईल क्रमांक आदींची माहिती संबंधित गावांकडून मागविण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हरिहर पत्की यांनी सांगितले की, एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत मदत पोहोचणे गरजेचे असते. त्या दृष्टीने मदतकार्यात लागणारे साहित्य जसे जेसीबी, क्रेन, अ‍ॅम्ब्युलन्स आदींची माहिती आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ही संपूर्ण माहिती गावनिहाय असणार आहे. पुणे येथील यशदा संस्थेकडून आलेल्या नमुन्यात ही माहिती संकलित केली जात आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली असून, त्यासाठी संबंधित नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. १० वर्षांतील आपत्तीचाही डाटागावनिहाय सुविधांची माहिती संकलित करतानाच गेल्या १० वर्षांतील आपत्तींचा आढावा घेण्यात येत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात कोणकोणत्या गावांत महापूर आला, भूकंप झाला किंवा दरड कोसळली याची माहितीही त्या तहसील कार्यालयांकडून मागविण्यात आली आहे.